आरोग्य

आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय

केसांसाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात अधिक भर पाडते. आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी केसांसाठी मेहेंदी आवर्जून लावतात. खरंतरं, केसांना मेहेंदी लावण्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पांढरे केस रंगवण्यासाठी बहुतेकजण हानिकारक डाय किंवा आर्टिफिशियल हेअर कलर्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक मेहेंदी वापरणंच अधिक पसंत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी मेहेंदी एक उत्तम पर्याय आहे. पण केसांना मेहेंदी लावताना ती नुसती पाण्यात भिजवून लावल्याने हवा तसा परिणाम मिळत नाही.

केसांना नैसर्गिक रंग आणि पोषण देण्यासाठी मेहेंदी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पण फक्त मेहेंदी भिजवून लावण्यापेक्षा त्यात काही खास पदार्थ मिसळल्यास तिचा रंग, सुगंध आणि केसांवरील फायदे दुप्पट होतात. योग्य पदार्थ घालून भिजवलेली मेहेंदी केसांना अधिक मऊ, मजबूत आणि चमकदार बनवते. केसांना योग्य पोषण मिळून त्यांचा रंग अधिक गडद आणि टिकाऊ होण्यासाठी मेहेंदीत काही खास पदार्थ मिसळणे खूप फायदेशीर ठरते. आपण मेहेंदी भिजवताना त्यात कोणते २ महत्त्वाचे पदार्थ घालावेत, ज्यामुळे केसांना चांगला रंग तर मिळेलच, पण केस मजबूत आणि चमकदार होतील, हे पाहूयात…

केसांसाठी मेहेंदी भिजवताना अशी भिजवा

शक्यतो पांढरे केस काळे करण्यासाठी किंवा केसांना मऊ, मुलायम व चमकदार करण्यासाठी तसेच केसांच्या अनेक समस्यांसाठी मेहेंदी वापरणे फायदेशीर ठरते. परंतु ही केसांसाठी मेहेंदी भिजवताना ती फक्त पाण्यांत न भिजवता, इतर काही पदार्थ त्यात घातले तर केसांना त्याचा अधिक फायदा होतो. इतकेच नाही तर पांढऱ्या केसांवरही चांगला नैसर्गिक रंग येऊन केस पुन्हा पहिल्यासारखे सुंदर दिसू लागतात.

मेहंदीत नेमके कोणते २ पदार्थ मिसळावेत

केसांवर मेहेंदी लावण्यापूर्वी ती नुसत्या पाण्यात भिजवण्यापेक्षा, मेथी दाण्यांची पेस्ट व बीटरुटचा किस हे दोन्ही पदार्थ जर मेहेंदीत घातते तर त्याचा केसांना दुप्पट फायदा होतो. यासाठी मेहंदी नेमकी कशी भिजवावी.

सगळ्यातआधी कपभर मेथी दाणे घेऊन ते पाण्यांत रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी ही मेथी दाण्यांची पेस्ट व पाणी एकत्रित मिक्सरच्या भांडयात घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. मग बीटरुट किसून त्याचा रस काढून घ्यावा. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मेथी दाण्यांची पेस्ट, बीटरूटचा रस आणि मेहेंदी पावडर भिजवून घ्यावी. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. तयार मेहेंदी ३० ते ३५ मिनिटे झाकून ठेवून द्यावी. मग एका ब्रशच्या मदतीने ही मेहेंदी पेस्ट केसांवर लावून घ्यावी. तासभर ही मेहेंदी केसांवर ठेवून मग पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावेत केस आधी फक्त पाण्यानेच धुवून घ्यावेत लगेच शाम्पूचा वापर करु नये. दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत.

मेहेंदी अशा पद्धतीने भिजवल्याने केसांवर होणारे फायदे

१) बीटाचा रस: बीटाचा रस केसांना नैसर्गिक लालसर रंग देतो आणि स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतो.

२) मेथी दाण्यांची पेस्ट: मेथी दाण्यांची पेस्ट केसगळती कमी करून केसांना मऊ करते व पोषण देते.

३) मेहंदी पावडर: मेहेंदी पावडर केसांना नैसर्गिक रंग देऊन त्यांना मजबूत व निरोगी बनवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

17 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

22 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

22 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

22 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

22 तास ago