आरोग्य

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक…

वयोमानाप्रमाणेच आपल्या त्वचेत देखील बदल होत जातात. वय वाढलं की त्वचेच्या अनेक समस्या सतावू लागतात. पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तर वाढतातच पण आणखी एक समस्या बहुतांशजणींना त्रास देते, ती म्हणजे त्वचेवर वाढू लागले ओपन पोअर्स. विशेषत: गालावर तर ओपन पोअर्स खूप जास्त स्पष्टपणे दिसून येतात.

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर असे ओपन पोर्स दिसू लागले की, चेहऱ्यावरची कोमलता, नाजूकपणा जाऊन चेहरा जास्तच वयस्कर वाटू लागतो.

१) ओट्स – दही: त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी आपण ओट्स आणि दही एकत्रित मिसळून स्क्रब तयार करू शकतो. या स्क्रबने मसाज केल्यास ओपन पोर्स स्वच्छ होतात तसेच ओपन पोर्सचा आकार बऱ्यापैकी कमी होतो आणि त्वचा कोमल दिसू लागते.

2) तांदुळाचे पीठ: गुलाबपाणी: तांदुळाचे पीठ आणि गुलाबपाणी हे उत्तम एक्सफॉलिएटर मानले जातात. तांदुळाच्या पिठामुळे सैल पडलेली त्वचा टाईट होण्यास मदत मिळते, तसेच ओपन पोर्सची समस्या देखील हळूहळू कमी होते. इतकेच नव्हे तर गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराइझ देखील केली जाते.

3) पपईचा गर: पपईचा गर हा ओपन पोर्सच्या समस्येवर अगदी उत्तम उपाय आहे. ताज्या पपईचा गर काढून ओपन पोर्स असलेल्या भागावर याने मसाज करावा. पपईमधील एन्झाइम्स ओपन पोर्स कमी करण्यास अधिक फायदेशीर ठरतात

4) कॉफी आणि मध: कॉफी आणि मध ओपन पोर्ससाठी अधिक फायदेशीर मानले जाते. यासाठी एका बाऊलमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध घालावे. कॉफी आणि मध यांच्या एकत्रित मिश्रणाने त्वचेला मसाज करून घ्यावा यामुळे ओपन पोर्स आतून स्वच्छ केले जातात. ओपन पोर्स बंद करण्यासाठी कॉफी आणि मध सर्वोत्तम मानले जाते.

५) ग्रीन टी आणि साखर: ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यास मदत करतात. साखर त्वचेला नैसर्गिक पद्धतीने स्क्रब करते. यामुळे ग्रीन टी आणि साखरेच्या मिश्रणाने ओपन पोर्सची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

६) मसूर डाळ: त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी मसूर डाळ वाटून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टने ओपन पोर्सवर हलकेच मसाज करून घ्यावा. यामुळे ओपन पोर्स हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.

७) मुलतानी माती आणि दूध: मुलतानी माती आणि दूध यांच्या एकत्रित मिश्रणाने त्वचेला मसाज करून घ्यावा. मुलतानी माती ओपन पोर्स आतून स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरते. मुलतानी माती आणि दूध या फेसमास्कमुळे ओपन पोर्स हळूहळू कमी होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

14 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

20 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

20 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

20 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

20 तास ago