शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तहसीलचा दुसरा एक अजब कारभार समोर आला आहे. शिंदोडी गावात अवैध माती उपशाबाबत तलाठी अलिशा महाकाल यांनी आधी पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मातीचोरी केल्याची शिरुर पोलिस स्टेशन येथे मंडल अधिकारी संपत खरात यांनी तक्रार दाखल केली.

 

अ‍ॅड विनायक लक्ष्मण फडके (रा. यशोदिप सोसायटी,वारजे माळवाडी, पुणे) यांच्या शिंदोडी गावातील गट नं २२३ च्या लगत असणाऱ्या मळईतुन अवैध माती उत्खनन करुन ती माती गावातील इतर लोकांना विकल्याचा प्रकार झाला होता. याबाबत विनायक फडके यांनी २८ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी शिंदोडी च्या तलाठी अलिशा महाकाल यांनी उत्खनन केलेल्या जागेवर जाऊन पंचनामा केला होता.

 

त्यानंतर विनायक फडके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर उशिरा जाग आलेल्या महसूल खात्याने तब्बल एक महिन्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी मंडल अधिकारी संपत खरात यांनी शिंदोडी येथील गट नं २२३ आणि गट नं २१७ मधुन अज्ञात व्यक्तीनी ६ लाख ४४ हजारांची मातीचोरी केल्याची तक्रार दाखल केली. तलाठी यांनी पंचनामा केल्यानंतर अवैध माती उत्खनन करणारी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई करणे अपेक्षित असताना महसूलच्या अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत टाळाटाळ केली.

 

त्यामुळे त्यानंतरही अवैध माती उत्खनन सुरुच राहिल्याने विनायक फडके यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे खनिकर्म विभाग, पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर दि १३ मे २०२५ रोजी शिरुर पोलिस येथे अजित ओव्हाळ, नंदु ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई आण्णा माने, राजेंद्र उमाजी माने (सर्वजण, रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) या पाच व्यक्तीविरोधात अवैध माती उत्खनन केल्याप्रकरणी फडके यांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे.

(क्रमशः)

शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श

शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago