आरोग्य

डोके दुखीपासून आराम मिळण्यासाठी काही उपाय…

डोके दुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. याची बरीच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपचन, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारु आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे.

डोके दुखीपासून लगेचच आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय…

१) लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करुन घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरुन ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करुन ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.

२) एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.

३) युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.

४) जर तुम्ही वारंवार होणार्‍या डोके दुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago