आरोग्य

दालचिनी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे…

 दालचिनीचे शरीरासाठी होणारे फायदे

१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते.

२) थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात.

३) जखमा बऱ्या करते: दालचीनी व मध एकत्र करुन जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी होते, कारण हे एंटिबँक्टेरिअल आहे.

४) चेहरा सुंदर करते: दालचिनी पावडर, दही, केळ, व लिंबाचा रस एकत्रीत करुन हि पेस्ट चेहऱ्याला वीस मिनिटे लावून ठेवा व नंतर धूवा. रक्ताभिसरण झाल्यामूळे त्वचा चमकते व चेहरा सुंदर दिसतो.

५) ओठ लालबुंद होतात: एका जारमध्ये दालचिनीच्या २-३ काड्या, आँलिव्ह आँईल मिसळून ठेवा, चार पाच दिवसात याचा रंग तेलात उतरेल.
मग रोज रात्री झोपतांना हे तेल ओठांना चोळून लावा. काही दिवसातच काळसरपणा जाऊन ओठ सुंदर लालचुटुक होतात.

६) दातदुखी: दालचिनीची पावडर करुन त्यात मध मिसळून याने हिरड्या व दात अश्या दोन्ही ठिकाणी मंजन करावे, दंतदुखी, पायरिया, किड, जिंजिवाईटिस, असे सर्व आजार दूर होऊन दात बळकट होतात.

७) संधिवात, सांधेदुखी: दालचिनीच्या तेलाने दुखऱ्या जागेवर मसाज केल्यास तिथले दुःख दूर होते व शिरा मोकळ्या होतात.

८) कोलेस्ट्रोल कमी करते: याच्या सेवनाने रक्तातल्या गुठळ्या तसेच अतिरिक्त चरबी वितळून रक्तप्रवाह सुरळित चालतो. अनुषंगाने ह्दयाचे कोणतेच विकार होत नाहीत व कोलेस्ट्रोल बँड तयार होत नाही.

९) मासिक धर्म: दालचिनी पावडर पाण्यात ऊकळवून मग त्यात मध मिसळून हे पाणी दिवसभर घ्यावे. पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्राव, कंबरदुखी, पायात पेटके येणे हे सर्व त्रास बंद होतात.

१०) लठ्ठपणा, ओबिसिटी दूर होते: दालचिनी एक एंटी- ऑक्सिडेंट आहे. पाँलिफेनोलीस मूळे लठ्ठ लोकात असलेला ऑक्सिडेंटीव स्ट्रेस कमी करतो. शरीरातला मेद जाळते व हळूहळू वजन कमी होते.

११) सर्दी, खोकला, दमा, अस्थमा: एक ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर, दोन लवंगा, टाकुन उकळवा व हा काढा थोडा थोडा घेत राहा. श्वसनाचे सर्व आजार बरे होतात.

१२) मधुमेह: दालचीनीत असलेले पाँलिफेनाल्स शरीरातील इंसूलिनची मात्रा योग्य ठेवते व त्यामूळे मधुमेह आटोक्यात राहतो. रोज अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर मधात मिसळून घ्या.

१३) कानदुखी व बहिरेपणा: दालचिनी व मध एकत्रीत घेतल्याने कानदुखी, बहिरेपणा दूर होतो. याच्या तेलाचे एक दोन थेंब कानात टाकल्यास कानातले सर्व प्रकारचे संक्रमण दूर होते.

१४) केसांचे आरोग्य: दालचिनी पावडर एक चमचा, एक चमचा मध व थोडे आँलिव्ह आँईल एकत्रीत करुन केसांची मालीश करावी याने केस गळणे थांबते. टक्कल सुध्दा जाते. तिथे केस येतात.

१५) कँन्सर: एक महिना जर दालचिनिचा काढा मध मिसळून घेतल्यास कँसरच्या पेशींची वाढ बंद होते व नविन चांगल्या पेशी वाढतात.

१६) जुलाब, डायरीया: एक चमचा दालचिनी पावडर, अद्रक किसून, जिरेपुड एक चमचा, व ४ चमचे मध असे मिश्रण बनवा. दिवसातून ३ वेळा घ्या. सर्व त्रास थांबतात. तसेच उलटी, मळमळ होत असेल तर दालचीनी व मध एकत्रीत करून ते चाटण घ्यावे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago