आरोग्य

दह्यात कालवून खा हे ५ पदार्थ

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकारासह अनेक गंभीर समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात असणे फार गरजेचे आहे. बदलेली जीवनशैली आणि आहारामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलचा धोका अधिक पटीने वाढतो. हा आपल्या शरीरात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे, ज्यामुळे हार्मोन्स बनवण्याचे कार्य करतो. कोलेस्टेरॉलमधील असंतुलनामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे गंभीर आजार होतात.

अनेकदा आपण शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच उपाय करतो. काहीवेळेस घरगुती उपचार प्रभावी ठरतात, त्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत. जे खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल वितळवेल.

१) दही आणि सब्जा: दह्यात प्रोबायोटिक्स घटक आहेत. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ४ चमचा सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून दह्यात मिसळवून खाऊ शकता. ज्यामुळे कोलेस्टेरॉलची समस्या कमी होईल.

२) बदाम आणि दही: बदाम हे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. यात असणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि प्रथिने उत्तम स्त्रोत मानले जातात. ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. हे नियमितपणे खाल्ल्याने पचन सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.

३) ग्रीन टी आणि लिंबू: ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सि़डंट्स असतात जे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात करण्यास मदत करतात. लिंबूमध्ये फ्लेव्होनॉइड्स आहे. या दोघांना एकत्र खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच हा आरोग्यदायी पदार्थ आहे.

४) लसूण आणि कांदा: यामध्ये कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म आहेत. लसणामध्ये ॲलिसिन असते. जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. तर कांद्यामध्ये क्वेर्सेटिन असते. जे एलडीएल कोलेस्टेरॉलचे ऑक्सि़डेशन रोखते. हे रोज एकत्र खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहाते.

५) हळद आणि काळीमिरी: हळद हा स्वयंपाकघरातील सगळ्या रामबाण मसाला आहे. यात दाहक-विरोधी आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक आहेत. काळीमिरीमध्ये हळदीतील सक्रिय पाइपरिन असतो जो कर्क्यूमिन शोषण्यास मदत करतो. याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, मनानं घेऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

28 सेकंद ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

3 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

12 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

12 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

12 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

12 तास ago