jayant-naralikar
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. पुणे येथील “लोकबोधिनी” या सामाजिक संस्थेतर्फे १२ ते १४ जानेवारी १९९७ रोजी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.मा. बाचल यांच्या हस्ते झाले होते. समारोप लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या उपस्थितीत झाला होता.
शिबिरात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मुकुंद महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्राचार्य नंदकुमार निकम, डॉ. अनंत फडके, डॉ. संजीवनी कुलकर्णी आदी तज्ज्ञांची व्याख्याने झाली होती. शिबिरात १४ जानेवारी १९९७ रोजी आयुकाचे संचालक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी “विज्ञान व मानवी समाज”या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन केले.
“समाजाने आपले राहणीमान सुधारणे व आत्मिक समाधान मिळविण्यासाठी आवश्यक तेवढ्याच विज्ञान व तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करावा. विज्ञानाचा वापर मानवी विनाशासाठी करायचा की रचनात्मक कामासाठी किंवा मानवी कल्याणासाठी करायचा याचा स्पष्ट निर्णय माणसाला करावा लागेल. विज्ञान आणि मानवी कल्याण तसेच विज्ञान आणि मानव यांचे दृढ नाते याची सांगड घालत अनेक उदाहरणे देऊन डॉ. नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या त्यांच्या दुर्मिळ व्याख्यानाची आठवण मात्र सर्व उपस्थितांना झाली असून सोशल मीडियावर त्यांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी शिबिर संयोजक लोकबोधिनीचे सचिव प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा. संजय देशमुख, संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संचालक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
निमगाव म्हाळुंगी सारख्या छोट्या गावात डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले याची आठवण माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केली आहे.
यावेळी डॉ. जयंत नारळीकर यांनी निमगाव म्हाळुंगी गावाचे कौतुक करून विविध महाविद्यालयातील आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले होते. तसेच घरी येऊन डॉ. जयंत नारळीकर व डॉ. रत्नाकर महाजन यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांना डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख झाले असून, एवढा मोठा वैज्ञानिक आपल्या गावात येऊन मार्गदर्शन केल्याची आठवण मात्र यावेळी सर्वांनाच झाल्याशिवाय राहिली नाही. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे आदींनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
– प्रा. नागनाथ शिंगाडे
पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…
निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …