शक्तिशाली प्रोटीनयुक्त पदार्थ
बिन्स असलेल्या भाज्या:- दररोज बिन्स असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हार्वर्ड मेडिकल हेल्थनुसार, बीन्स असलेल्या भाज्यांमध्ये प्रोटीनचा खजिना दडलेला आहे. एक कप बिन्स असलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला १५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. इतकेच नाही तर बीन्समध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फोलेट, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज यांसारख्या घटकांचा समावेश असतो. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यासह ब्लड शुगरची पातळीही नियंत्रणात राहते.
नट्स:- बदाम, हेझलनट्स, अक्रोड, शेंगदाणे, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया, फुलाच्या बिया, पीनट बटर इत्यादी प्रथिनांचे पॉवरहाऊस आहेत. प्रथिनांसह त्यात हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळते. या गोष्टींमध्ये कॅलरीज पण असते. ज्यामुळे शरीराला झटपट ताकद मिळते. या गोष्टी पाण्यात भिजत घालून खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
क्विनोआ:- क्विनोआ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यासह यात फायबर, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. क्विनोआ खाल्ल्याने शरीराला ८ ग्रॅम प्रोटीन मिळते. तर, ५ ग्रॅम फायबर मिळते.
ओट्स:- वेट लॉससाठी बरेच जण ओट्स खातात. अर्धा कप ओट्समध्ये ५ ग्रॅम प्रोटीन असते. तर ४ ग्रॅम फायबर असते. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, ओट्स अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे. आपण ओट्सचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…
शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…
पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…
घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…
आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…