आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कटू शब्द टाळून गोड बोलण्याची सवय लावल्यास आजच नव्हे तर पुढील काळातही लाभ होईल. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ असेल. मुलांकडून अपेक्षेप्रमाणे बातमी न मिळाल्याने मन थोडे खिन्न होईल. मकर संक्रांतीनिमित्त नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेकडे वाटचाल करा.

वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधान देणारा आहे. राजकीय क्षेत्रात असाल तर प्रयत्नांना यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारत असल्याने गुंतवणुकीचा विचार करता येईल. रात्री काही लोक त्रास देऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करा.मकर संक्रांती असल्याने गोड बोलण्यासोबत कायम संयम आणि स्थैर्य ठेवा, प्रगती निश्चित होईल.

मिथुन: मिथुन राशीसाठी दिवस संमिश्र आहे. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या. दिवसभर व्यस्तता राहणार आहात. नशिबाची साथ असली तरी प्रत्येक कामात लक्ष द्या. मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश आनंद देईल. कुटुंबासोबत मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. जीवनात सदैव समतोल राखण्याचा संकल्प मकर संक्रांतीनिमित्त करा.

कर्क: कर्क राशीसाठी दिवस उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. समाजात मान-सन्मान वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. मुलांशी संबंधित जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडतील. संध्याकाळी मंगल कार्यक्रमात सहभागी होणार आहात. मकर संक्रांतीपासून नवीन प्रकाशाकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल, त्याचा लाभ घ्या.

सिंह: सिंह राशीसाठी दिवस लाभदायक आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी दिवस शुभ आहे. स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा आणि डोळ्यांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. मकर संक्रांतीपासून सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरु होतो. त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होते. तुम्ही सुद्धा सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी होण्याचा प्रयत्न करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा.

कन्या: कन्या राशीसाठी दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यापारातील प्रयत्नांना मोठे यश मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वादात विजय मिळाल्याने आनंद होईल. शुभ कार्यांवर खर्च होणार आहे त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. मकर संक्रांतीच्या शुभ दिवसापासून स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे हाती घेतलेले प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण होईल.

तूळ: तुळ राशीसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. घरात आनंदी वातावरण असेल आणि सर्व सदस्य समाधानी असतील. दीर्घकाळापासूनची देणे-घेण्याची समस्या सुटण्याची शक्यता आहे. पुरेसा पैसा हातात आल्याने मन प्रसन्न असेल. प्रवासाचा योग असून तो पुढे ढकलला जाऊ शकतो. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मकर संक्रांतीनिमित्त गोड तर बोलायचं शिवाय आपलेपणा, समजूतदारपणा जपा.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. श्वास किंवा रक्तासंबंधी त्रास जाणवू शकतो. आवश्यक तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजारपण असूनही कामानिमित्त धावपळ होणार आहे. मानसिक त्रास जास्त होणार नाही असे पाहा. मकर संक्रांतीपासून शरीर आणि मन शुद्ध आणि समाधानी ठेवण्याचा संकल्प करा.

धनु: धनु राशीसाठी दिवस अत्यंत शुभ असून चक्क विरोधकही तुमचे कौतुक करतील. सत्ताधारी पक्षाशी असलेल्या संबंधांचा लाभ होईल. मकर संक्रांतीमुळे दिवसभर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग राहील. दिवसभर दुसऱ्यांना मदत करणार आहात तसचे प्रत्येक काम उत्साहात पूर्ण होईल.

मकर: मकर राशीसाठी दिवस सकारात्मक आहे. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. मकर संक्रातीच्या दिवशी नवीन काम करणे तुमच्यासाठी लाभदायक असेल. सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि मान-सन्मान वाढेल. वादविवाद टाळा आणि सगळ्यांशी गोड गोड बोला. मकरसंक्रातीनिमित्त घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस थोडा कठीण आहे. निरर्थक वाद आणि शत्रू वाढण्याची शक्यता आहे. चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. एखाद्या वाईट बातमीमुळे अचानक प्रवास करावा लागू शकतो. मकर संक्रांतीनिमित्त गोड बोलण्यासह संयम आणि शांत राहून काम करण्याचा स्विकार करा.

मीन: मीन राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि त्यांच्या कामांमध्ये वेळ जाईल. सासरच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार टाळावेत. धार्मिक कार्यांवर खर्च वाढेल. जोडीदारासोबतचे नाते सुधारेल. प्रवासात सावध रहा, चोरीची शक्यता आहे. तुम्ही नेहमी गोड बोलता, मकर संक्रांतीनिमित्त गोड बोलण्यासह कामातील फोकस आणि सावधगिरी यांचा समतोल ठेवा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

7 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

7 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

7 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

7 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

8 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

11 तास ago