महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बोर्डाचे कडक नियंत्रण

P

सोलापूर: इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारीपासून, तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

प्रत्येक भरारी पथकाला किमान चार शाळांना भेटी देणे बंधनकारक असून, त्या शाळांतील लॅब, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांचे जर्नल व प्रयोग करतानाचे जीओ-टॅग फोटो बोर्डाला पाठवावे लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या

इयत्ता बारावी : १२० परीक्षा केंद्रे

इयत्ता दहावी : १८८ परीक्षा केंद्रे

प्रत्येक परीक्षा केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच परीक्षेदरम्यान ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. लेखी परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकांमध्ये सरमिसळ करण्यात येणार असून, आपल्या शाळेचे विद्यार्थी नसलेल्या केंद्रांवरच शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले जातील.

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांवरही विशेष लक्ष

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी बहिस्थ: परीक्षकांची नावे थेट बोर्डाकडून अंतिम केली जाणार आहेत. अचानक भेट देणाऱ्या भरारी पथकांमध्ये

गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा समावेश असेल.

संनियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, यासाठी बोर्डाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

अनुदानित शाळांतील शिक्षक स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवर बहिस्थ: परीक्षक म्हणून जाणार

स्वयंअर्थसहाय्यिता शाळांतील शिक्षक अनुदानित शाळांतील प्रात्यक्षिक परीक्षा घेणार

लेखी परीक्षेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पर्यवेक्षकांचे मोबाईल झूमद्वारे जोडले जाणार

जिल्हा मुख्यालयातील संनियंत्रण कक्षातून वरिष्ठ अधिकारी थेट निरीक्षण करणार

“प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी बोर्डाने कडक उपाययोजना केल्या आहेत,”

औदुंबर उकीरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे बोर्ड

लॅब व प्रयोगशाळांची तपासणी अनिवार्य

भरारी पथकाने शाळांमध्ये

अद्ययावत लॅब आहे का

प्रत्यक्ष प्रयोग होतात का

विद्यार्थ्यांची जर्नल पूर्ण आहेत का

याची पडताळणी करून जीओ-टॅग फोटो बोर्डाला पाठवणे बंधनकारक आहे. याबाबत विषय शिक्षकांना माहिती देण्यासाठी शनिवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago