आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत नवीन डिल होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील वातावरण ठिक असेल तसेच नियोजित कामे पूर्ण होतील. सरकारी स्तरावर मान-सन्मान मिळण्याचा योग आहे. ऑफिसमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेची दखल घेतली जाईल. समाजासाठी चांगल्या कार्यावर खर्च होईल. कुटुंबात सुख समाधान असेल.

वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची साथ मिळेल आणि कामाचा ताण कमी जाणवेल. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. नवीन योजनांवर चर्चा करण्यासाठी ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल. तीर्थयात्रेचा विचार मनात येईल आणि त्यासंदर्भात काही प्लॅनिंग करणार आहात. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. कुटुंबात समाधानी वातावरण असल्यामुळे तुम्ही आनंदी असाल.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. क्रिएटिव्ह कामाला अधिक वेळ द्याल. ऑफिसमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. तुमच्या योजना किंवा तुम्ही सुचवलेल्या काही गोष्टींना ऑफिसमध्ये मान्यता मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूक लाभदायक असेल. घरातील वातावरणात सुखसमाधान राहणार आहे.

कर्क: कर्क राशीसाठी दिवस क्रिएटीव्ह आहे. नवीन योजना तयार होतील. मेहनत जास्त लागेल, पण अपूर्ण कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमच्या मतानुसार निर्णय घेतले जातील. सहकाऱ्यांची मदत मिळेल. संध्याकाळी मंगलकार्याचा योग आहे. तिथे प्रियजनांच्या भेटीमुळे मानसिक समाधान वाढेल.

सिंह: सिंह राशीचे जातक दिवसभर व्यस्त राहतील. अध्यात्माकडे ओढ वाढत जाणार आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. रात्री कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कन्या: कन्या राशीसाठी दिवस साधारण आहे. संवादातून प्रश्न सुटू शकतात. ऑफिसमध्ये शांतपणे आणि संयमाने काम करणे आवश्यक आहे. वादविवाद टाळल्यास काम सुरळीत पार पडेल. नशिबावर विश्वास ठेवा आणि पुढे जा तुम्हाला नक्की यश मिळेल. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.

तुळ: तुळ राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये नियोजन आणि फोकस महत्त्वाचा ठरेल. जुने वाद मिटून कामातील गती वाढेल. मालमत्तेसंदर्भात घरात थोडा तणाव जाणवू शकतो.तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस शुभ आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रयोग करणार आहात त्यात उत्तम यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमचा उत्साह इतरांनाही प्रेरणा देईल. घरातील वातावरण सकारात्मक असेल.

धनु: धनू राशीच्या जातकांसाठी दिवस अनुकूल आहे. संधी ओळखल्यास लाभ होईल. व्यवसायात मर्यादित जोखीम फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्च टाळा. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे काम पटापट मार्गी लागले.

मकर: मकर राशीसाठी दिवस ठीक आहे. भागीदारीतील व्यवसायात लाभ होईल. ऑफिस किंवा व्यवसायात जबाबदाऱ्या वाढू शकतात. तेव्हा कामातील फोकस वाढवावा लागेल. घरातील कामे मार्गी लागतील. तणाव वाढू शकतो, तब्येतीची काळजी घ्या.आहार आणि झोप याकडे खास लक्ष द्या.

कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये घाई केल्यास चुका होऊ शकतात, त्यामुळे फोकस ठेवा. घरातील वातावरण स्थिर राहील. तुम्ही योगा किंवा ध्यानधारणा करा यामुळे ताण कमी होईल.

मीन: वैवाहिक जीवन आनंदी असेल, परंतु मुलांबद्दलची तुमची चिंता आज चिंतेची बाब राहील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आज संशोधन कार्यात यश मिळेल. शिक्षणाच्या बाबतीतही आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago