उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
ठाणे: राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मुंबईतही सकाळीच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयी-सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे,” असे आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…