आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. धनप्राप्तीचे योग असून नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. वरिष्ठांचे लक्ष तुमच्यावर राहील त्यामुळे कामात अधिक फोकस ठेवा. जास्त कामामुळे चिडचिड वाढू शकते, संयम ठेवा. संध्याकाळी कुटुंबासह मंगल कार्यात सहभागी होण्याचा योग आहे.

वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस शुभ आहे. संपत्ती आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठ व्यक्तीकडून धनलाभ होऊ शकतो. नोकरीत रिलोकेशनचे योग असून प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. अनावश्यक खर्च टाळा. रात्री संगीत कार्यक्रमात सहभागामुळे मानसिक समाधान मिळेल.

मिथुन: मिथुन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरीत उच्च पदप्राप्तीचा योग आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. सहकारी व भागीदारांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उत्साहाने काम केल्यास यश नक्की मिळेल.

कर्क: कर्क राशीसाठी दिवस यशदायी आहे. राजकारणाशी संबंधित लोकांचा मानसन्मान वाढेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मुलांसाठी घेतलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पडेल. मित्रांच्या मदतीने निराशा दूर होईल. वाचनात मन रमेल व झोपेची समस्या दूर होईल.

सिंह: सिंह राशीसाठी दिवस अत्यंत उत्तम आहे. घरात मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. मित्रांच्या मदतीने व्यवसायात नवे मार्ग खुलतील. उत्पन्नात वाढ व अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो, आहारावर नियंत्रण ठेवा.

कन्या: कन्या राशीसाठी दिवस मेहनतीचा आहे. कामाचा ताण वाढेल मात्र उत्पन्नात योग्य वाढ होईल. लेखन व बौद्धिक कामातून लाभ होईल. राग आणि वाद टाळा. मुलांच्या शिक्षणात चांगले यश दिसून येईल. भावंडांच्या सहकार्याने नातेसंबंध सुधारतील.

तूळ: तूळ राशीसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. इच्छेविरुद्ध काम करावे लागू शकते त्यामुळे अस्वस्थता वाढेल. अचानक खर्च उद्भवू शकतो. मात्र नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.

वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी दिवस फलदायी आहे. रखडलेली पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. हुशार व्यक्तीच्या मदतीने कामे मार्गी लागतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या बुद्धीमत्तेमुळे मान-सन्मान वाढेल.

धनु: धनु राशीसाठी दिवस थोडा अडचणीचा आहे. कामात अडथळे येतील व परिश्रम वाढतील. बोलताना संयम ठेवा, कुटुंबात वाद होऊ शकतो. भावंडांमध्ये मतभेद संभवतात. संध्याकाळी प्रवासाचा योग आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

मकर: मकर राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. संपत्ती प्राप्तीचे योग असून यश मिळेल. भाग्य साथ देईल व शत्रूंचा पराभव होईल. बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरतील. मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल.

कुंभ: कुंभ राशीसाठी दिवस उत्तम आहे. संपत्तीत वाढ होईल. नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढतील. रागावर नियंत्रण ठेवा, जोडीदाराशी मतभेद टाळा. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभाग व भविष्यात तीर्थक्षेत्र यात्रेचा योग आहे.

मीन: मीन राशीसाठी दिवस संमिश्र फलदायी आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. घराच्या दुरुस्तीवर खर्च होईल. मित्र किंवा नातेवाईक घरी येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. देश-विदेशातून शुभ समाचार मिळेल. गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा लाभ होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

9 मिनिटे ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

13 मिनिटे ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

15 मिनिटे ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

12 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

16 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

17 तास ago