राजकीय

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या खऱ्या लढतीला आता सुरवात झाली आहे.

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी रांजणगाव-कारेगाव परिसरात ढोल-ताशे, फटाके आणि घोषणांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गटातील विविध गावांमधून आलेले कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात भाजपचे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे आणि “भाजप जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

महागणपती आणि शिवछत्रपतीचां आशिर्वाद…

स्वाती पाचुंदकर, मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी सर्वात आधी रांजणगावच्या महागणपती मंदिरात जाऊन आरती करत बाप्पाचा आशिर्वाद घेतला. त्यानंतर शिरुरचे सालकरी म्हणुन ओळख असलेले माजी आमदार कै बाबुरावजी दौंडकर स्मारक समिती येथे जाऊन दौंडकर यांच्या पुतळ्याला हार घालत त्यांना अभिवादन केले. त्यानंतर रांजणगावच्या मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवाजी महाराजांची आरती करुन गावातील इतर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर कारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि मोठे शक्तीप्रदर्शन करत सर्व उमेदवार शिरुरला तहसीलदार कार्यालयात रवाना झाले.

रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात सर्व साधारण महिला आरक्षण असुन भारतीय जनता पक्षाकडुन स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

तर रांजणगाव पंचायत समिती गणात खुला वर्ग हे आरक्षण या गणात असुन भारतीय जनता पक्षाकडुन सागर शिवाजी देवकर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या गणात रांजणगाव गणपती,खंडाळे, पिंपरी दुमाला, कोंढापुरी, गणेगाव खालसा, पिंपळे धुमाळ, बाभुळकर, बुरुंजवाडी हि गावे येतात.

तसेच कारेगाव पंचायत समिती गणातही खुला वर्ग आरक्षण असुन भारतीय जनता पक्षाकडुन मनिषा सतिश पाचंगे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या गणात कारेगाव, निमगाव भोगी, ढोकसांगवी, सोनेसांगवी, वाघाळे,वरुडे, चिंचोली मोराची,कान्हूर मेसाई हि गावे येतात.

रांजणगाव येथुन मोठे शक्तीप्रदर्शन करत शिरुरच्या दिशेने चारचाकी वाहनांचा ताफा काढण्यात आला. यावेळी भाजपचे राज्य पातळीवरील व जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्तीप्रदर्शनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

6 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

6 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

6 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

6 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

8 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

10 तास ago