आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज ‘कमी वेळात अधिक लाभ’ अशा योजनांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणासाठीही जामीन राहू नका. आर्थिक देवाण-घेवाणीत विशेष लक्ष द्यावे लागेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. धार्मिक कार्याची शक्यता असून नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ: घर आणि संततीशी संबंधित आनंददायक बातमी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यावसायिक लाभ संभवतो; मात्र दुपारनंतर आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.

मिथुन: व्यवसायासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. येणी वसूल होतील. वरिष्ठांची मर्जी मिळाल्याने नोकरीत लाभ होईल. वडीलधाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. दुपारनंतर सहलीचा बेत आखला जाऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क: दिवसाची सुरुवात मानसिक तणावाने होईल. संततीविषयक चिंता सतावेल. मात्र दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन उत्साह वाढेल. व्यापारी येणी वसूल होतील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विचार आणि वर्तनावर संयम ठेवणे गरजेचे आहे. मानसिक व शारीरिक थकवा जाणवेल. संततीविषयक कारणामुळे खर्च वाढू शकतो. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतो, मात्र अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कन्या: सकाळचा वेळ मित्रांसोबत आनंदात जाईल. भागीदारीत लाभ होईल. दुपारनंतर प्रकृती बिघडू शकते. अचानक खर्च येईल, मात्र त्याचवेळी धनलाभ झाल्याने दिलासा मिळेल.

तूळ: आत्मविश्वास आणि मनोबलामुळे यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दुपारनंतर मनोरंजन किंवा पर्यटनाचा योग आहे.

वृश्चिक: भावनिकता वाढेल, मानसिक समतोल राखणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. साहित्य, कला व सर्जनशील क्षेत्रात नवे प्रयोग दिसून येतील. व्यवसायात प्रगती होईल.

धनु: कौटुंबिक शांततेसाठी वाद टाळा. धन व प्रतिष्ठेला धक्का बसण्याची शक्यता आहे. दुपारनंतर सृजनशीलतेत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.

मकर: महत्त्वाचे निर्णय शांत आणि स्थिर मनाने घ्या. मित्र-आप्तांच्या भेटीने आनंद मिळेल. प्रवासाचा योग आहे. दुपारनंतर मन अस्वस्थ राहील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारात सावध राहा.

कुंभ: वाद-विवाद टाळा, अन्यथा कटुता निर्माण होऊ शकते. खाण्या-पिण्यात संयम ठेवा. दुपारनंतर मानसिक स्थैर्य लाभेल. सर्जनशील कामातून मान-सन्मान मिळू शकतो.

मीन: घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. दुपारनंतर संताप वाढू शकतो. आहार व वाणीवर नियंत्रण ठेवा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago