मुंबई: बिग बॉस मराठी ६ च्या घरात दुसऱ्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक अनुश्री मानेने तिचा आक्रमक खेळ दाखवायला सुरुवात करत राकेशसोबत थेट वाद उभा केला आहे. घरातील मोठ्या बेडवरून सुरू झालेल्या या वादामुळे संपूर्ण घरातील वातावरण तापले आहे.
राकेशला पाठदुखीचा त्रास असल्याने मोठ्या बेडवर झोपायची गरज होती. मात्र अनुश्रीने ती जागा सोडण्यास नकार दिला. घरातील इतर सदस्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही अनुश्री कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. यावेळी अनुश्रीने राधावर मोठ्याने ओरडत आडमुठेपणा केल्याचं पाहायला मिळालं.
राकेशने समजुतीने अनुश्रीचा हात धरून तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र या कृतीवरून पुढे मोठा वाद निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी रुचिता जामदारने हा मुद्दा पुन्हा उचलत स्पष्ट मत मांडलं की, “कोणत्याही मुलीला परवानगीशिवाय हात लावू नये.” या वक्तव्यामुळे अनुश्री आणि राकेशमधील भांडण अधिकच चिघळलं.या संपूर्ण प्रकरणावर ‘भाऊचा धक्का’चा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्यात होस्ट रितेश देशमुख प्रचंड संतापलेल्या अवस्थेत दिसत आहेत. प्रोमोमध्ये रितेश म्हणताना दिसतात,
“मुलींना परवानगीशिवाय हात लावायचा नसतो म्हणजे काय?”
रुचिताने अनुश्रीला खेचणं चुकीचं असल्याचं सांगितल्यानंतर रितेश अधिकच संतापतात. ते स्पष्टपणे सांगतात की, जर एखादी व्यक्ती समजावून सांगण्याच्या लायकीची नाही असं म्हटलं जात असेल, तर पुढच्या दिवशी समजावणारा चुकीचा ठरतो, असं होऊ शकत नाही.
रितेशच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे घरातील वातावरण आणखी गडद झालं असून अनुश्रीलाही मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे. मागील सीझनमध्ये जान्हवी किल्लेकरला ‘भाऊचा धक्का’वरून घराबाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे यंदा रुचिता जामदारवरही कारवाई होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आता येणाऱ्या ‘भाऊचा धक्का’च्या भागात नेमका काय निर्णय घेतला जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…