आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण फार खर्च करु नका, बचतीकडे लक्ष द्या.

वृषभ: आजचा दिवस समाधान आणि शांततेने भरलेला आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची रणनीती उत्तम आहे हे सिद्ध होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन डिलमुळे पद, प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. रात्री काही असे लोक भेटतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही दुर्लक्ष करा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारते आहे, गुंतवणुकिचा विचार करा.

मिथुन: सतत ईमेलला उत्तर देणे, मिटिंग यात व्यस्त राहणार आहात. दरम्यान मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. तुम्हाला आज खूप सर्तक रहावे लागेल. जे काही काम कराल त्यात नशिबाची साथ असेल पण कामात फोकस ठेवा. मुलांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश आहे. जे फ्रिलान्स करत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात

कर्क: तुम्ही जिथे काम करता तिथे उत्तम प्रगती होणार आहे. तसेच मान सन्मान वाढेल. खूप दिवसांपासून व्यवसायात एका डिलची तुमची वाट बघत होतात, त्याबद्दल सकारात्मक बातमी समोर येईल.प्रवासाचा योग असून त्यातून सुखद अनुभव येणार आहे. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणार आहात. व्यवसायाच्या बाबतीत कामे वाढत आहेत, नियोजन व्यवस्थित करा. आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतवणुकीचा विचार करु शकता.

सिंह: तुमच्यासाठी दिवस चांगला असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होत आहेत. तुम्ही मिळकतीच्या नवीन मार्गावर मार्गक्रमण करा लाभ होईल. तुमच्या वाणीत सौम्यपणा आणि आदरभाव असू दे म्हणजे तुमचा मान वाढेल आणि लोकं तुमचे बोलणे ऐकतील. शिक्षण, स्पर्धेत विशेष यश मिळणार आहे. तुमची आज खूप धावपळ झाल्यामुळे थकवा आणि डोळ्यांचे आजार होवू शकतात, तब्येतीची काळजी घ्या. विरोधक फार काही करु शकणार नाही, त्यामुळे रिलॅक्स राहा.

कन्या: तुमच्या हुशारीने कामे पूर्ण होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात तुम्ही केलेले प्रयत्न उत्तम यश देतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल, तुमचे सगळीकडे कौतुक होणार आहे. दुपारनंतर कोणताही कायदेशीर वाद आणि खटला, यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल. चांगल्या कामासाठी समाजात खर्च करणार आहात. दानधर्म केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर त्यात सकारात्मक गोष्ट समजेल.

तूळ: अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक देवाणघेवाणची समस्या सुटू शकते. हातात पुरेशी रक्कम आल्यामुळे आनंद असेल, बचतीचा विचार नक्की करा. विरोधक काहीही करु शकणार नाही. आज प्रवासाची शक्यता आहे.आज तुमच्या आजूबाजूला सुखद वातावरण असेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद पाहून तुम्ही देखील खूप समाधानी असाल. नवीन गोष्टींचा उपयोग व्यवसायात करायचा असेल तर नक्की करु शकता.

वृश्चिक: आजचा दिवस फारसा ठिक नाही. नोकरी आणि व्यवसायात कामे वाढत आहेत त्याचे योग्य नियोजन करा. तुम्हाला तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. काही आजार डोके वर काढत असतील तर त्वरित तपासणी करा. आजारपणात तुमची धावपळ होणार आहे. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. आजारपणामुळे खर्च जास्त होणार आहे. आर्थिक तजवीज करुन ठेवावी लागेल.

धनु: तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी पाहून आज विरोधक तुमचे काहीही करु शकणार नाहीत. आजचा दिवस चांगला असून तुमची सरकारी कामे मार्गी लागतील. तुमच्या ओळखीचा फायदा होवू शकतो. सासरकडून तुमचा मानसन्मान होणार आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. दानधर्म करणार असून आर्थिक स्थिती चांगली असेल.

मकर: आपल्यासाठी आजचा दिवस चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत उत्तम यश आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात खास प्रयत्न केले असतील तर अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुमचे सहकारी तुमचा आदार करतील आणि कामात मदत करतील. कोणतेही भांडण किंवा वादात पडू नका. पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चात वाढ होईल, आर्थिक व्यवस्था आधीच करुन ठेवा. जे काम हाती घेणार ते दिवसभरात पूर्ण करणार आहात.

कुंभ: आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे कठिण असेल. तुम्ही केलेल्या कामात अडचण किंवा कामे वेळत पूर्ण न होणे असे काही घडल्यामुळे निराशा होवू शकते. एखादी वाईट बातमी ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. विनाकारण वाद आणि चिडचिड टाळायला हवी. आज कोणतेही काम करताना सावध राहा आणि वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा.

मीन: आज तुम्हाला सावध रहावे लागेल. प्रवासात मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे. आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होते आहे. चांगल्या कामावर खर्च करणार आहात. वैवाहिक जीवनात सुरु असलेले वाद कमी होतील. मुलांच्या बाबतीत काही अडचणी वाढू शकतात. सासरकडील मंडंळींसोबत आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावा. आज कामाचा वेग कमी असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

9 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

33 मिनिटे ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

16 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

16 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

16 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

1 दिवस ago