आरोग्य

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू कार्यान्वित होतात.

प्रत्येक स्नायूच्या आकुंचनाबरोबर स्नायूत असणारं रक्त नीलांमधून हृदयाकडे पाठवलं जातं. त्यामुळे हृदयाकडे येणार्‍या रक्ताचं प्रमाण बरंच वाढू लागतं. याचा परिणाम नाडीची व श्वसनाची गती वाढण्याकडे होतो. अशी वाढलेली गती हृदयाच्या स्नायूंना व्यायाम घडवते. असा व्यायाम दररोज अर्धा तास आठवड्यातले पाच दिवस केला तर रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन्ही संस्था अधिकाधिक कार्यक्षम होऊ शकतात.

दुसरीकडे अजिबात दमछाक न होता पण अधिक काळ काम करत राहता यावं, या उद्देशाने जे व्यायाम करता येतात, त्यात व्यायाम करताना नाडीची गती फारशी वाढण्याची आवश्यकता नसते. उलट ते संथ गतीने केले तरच ते दीर्घकाळ करता येतात. संथ चालताना स्नायूंवर, सांध्यांवर, पाठीच्या कण्यावर, श्वसनावर ताण येत नाही. स्नायूंना आपलं काम करण्यास लागणारी ऊर्जा प्राणवायूचा वापर करून मिळवता येते. चयापचयावरही ताण येत नाही. म्हणूनच असं सांगितलं जातं की, संथ गतीने आठवड्याला आठ ते दहा तास चालणं हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

28 मिनिटे ago

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

3 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

4 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

4 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

5 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

22 तास ago