मेष: आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूप लाभदायक आहे. तुमची पेंडीग कामे आज पूर्ण होणार आहेत. तुमचा मुड आज चांगला असून तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला घरातील काही सदस्यांना आर्थिक मदत करावी लागेल. आजचा दिवस इतरांना मदत करण्यात जाणार आहे. संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुमची खूप धावपळ होणार आहे.
वृषभ: आजचा दिवस उत्तम आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे कारण तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दुपारी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. तुम्हाला तब्येतीची खूप काळजी घ्यायला हवी, आज कोणतेही काम करताना सतर्क राहा. संध्याकाळी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तयार राहा. तुमची कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही समाधानी असाल.
मिथुन: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही तयार केलेल्या योजना सफल होणार आहेत तसेच तुमची रणनीती काम करेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. वडिलांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांचा पाठिंबा तुमच्यासाठी आज खूप महत्त्वाचा ठरेल कारण यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल. व्यवसायात काही नवीन करार होणार आहेत. आज घरात देखील तुम्हाला खूप काम असेल. वाहन वापरताना काळजी घ्या. सासरकडून तुम्हाला लाभ मिळणार आहे.
कर्क: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीकोनातून दिवस अतिशय उत्तम आहे. तुम्हाला व्यवसायात नफा होणार आहे. अचानक धन प्राप्ती झाल्यामुळे तुम्ही आनंदात असाल. तुमच्या योजना यशस्वी झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्ही केलेली आर्थिक गुंतवणूक तुम्हाला खूप लाभ देणार आहे. आर्थिक योजनांचे यशस्वी परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. मानसन्मानात वाढ होईल. आज भावनांच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका तुम्हाला त्रास होईल.
सिंह: तुम्ही ऑफिस आणि व्यवसायात ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या सकारात्मक परिणाम होणार आहे. राजकीय क्षेत्रात तुम्हाला उत्तम यश मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे जाणार आहात तसेच तुमची कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. ऑफिसमध्ये तुमची प्रतीमा उत्तम असेल, व्यवसायात नफा होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरील ओझे कमी होईल. आज कुटुंबाला खूप वेळ देणार आहात.
कन्या: आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. तुमच्यात सकारात्मक बदल होणार असून तुम्ही क्रिएटीव्ह कामात आज जास्त लक्ष देणार आहात. धनसंपत्ती वाढणार असून प्रतीकूल परिस्थितीत तुम्हाला फायदा होईल. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा तरच योजना यशस्वी होतील. अचानक धनलाभाचे योग असून बँक बॅलेन्स वाढेल. जीवनात सुख समृद्धीचा योग असून तुमची कामे मार्गी लागल्यामुळे मन प्रसन्न असेल.
तूळ: आजचा दिवस शुभ असून तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल किंवा तुम्ही एखादी स्पर्धा परिक्षा दिली असेल तर तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत त्याचा लाभ घ्या. सतत होणारी धावपळ आणि हवामानातील बदल यामुळे तुमच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आज प्रत्येक कामात सावध आणि सतर्क राहा. प्रवासाचा योग आहे आणि प्रवासात तुम्हाला उत्तम लाभ होईल. आज जोडीदारीच प्रत्येक कामात साथ असेल.
वृश्चिक: आजचा दिवस फायद्याचा असून आर्थिक स्थिती उत्तम असेल. तुमचा बँक बॅलेन्स वाढणार आहे त्यामुळे थोडा ताण कमी होईल. प्रियजनांच्या भेटी होतील त्यामुळे समाधान मिळेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा म्हणजे विपरीत परिस्थिती अधिक चिघळणार नाही. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत आनंदात व्यतीत होईल. पाहुणे आल्यामुळे तुमच्या उत्साहाला उधाण येईल.
धनु: आज दिवस फारसा ठिक नाही तुम्ही जास्त खर्च करणार आहात. तुमच्या संसारातील सुख सुविधा अधिक वाढतील. तुमच्यावर आज कोणीतरी दबाव आणण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला जास्त ताण येवू शकतो त्यामुळे तुमच्या कामावर त्याचा परिणाम होईल. व्यवसायात भागिदारासोबत व्यवहार करताना सावध राहा कारण आर्थिक गडबड होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या चकरा वाढणार आहेत पण काळजी करु नका विजय तुमचाच असेल. विरोधकांच्या योजना आज असफल होतील. तुम्ही टेन्शन घेवू नका.
मकर: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. व्यवसायात तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्ही कामात केलेले बदल सकारात्मक ठरणार असून तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. कुटुंबात तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वाहन चालवताना सावध राहा, कारण वाहनात बिघाड झाला तर खर्च वाढू शकतो.
कुंभ: आजचा दिवस धावपळीचा आहे प्रामुख्याने करियरच्या बाबतीत तुमची खूप धावपळ होणार आहे. आज तुम्ही खूप खर्च करणार आहात. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची तपासणी करणे खूप आवश्यक आहे. कुटुंबातील आजारी व्यक्तीची तब्येत सुधारणार आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. रात्री प्रियजनांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
मीन: आजचा दिवस शुभ असून तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात उत्तम प्रगती होणार आहे त्यामुळे तुमचे मन आनंदी असेल. विद्यार्थ्यांची मानसिक ताणतणावातून सुटका होणार आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल त्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतील. संध्याकाळी कार्यक्षेत्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती हाती लागेल त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…