मुख्य बातम्या

शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावातील यश इन चौक सध्या गुन्हेगारी हालचालींमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गुटका, खर्याची विक्री, मटका, जुगार, दारुविक्री, तसेच गांजा, रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली आणि त्यात भरीस भर म्हणजे दोन दिवसांपुर्वी झालेला खून यामुळे हा चौक आता ‘अवैध धंदे’ तसेच गुन्हेगांराचा अड्डा’ बनल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात ३० वर्षांपुर्वी आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहीली. कारेगाव, रांजणगाव आणि ढोकसांगवी या गावातील हजारो हेक्टर जमीन या औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत करण्यात आली. या औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या. त्यामुळे स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तसेच काहींनी व्यवसायात आपले पाय रोवले. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आली.

परप्रांतीय कामगार अन अवैध धंदे…

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तसेच बाहेरच्या राज्यातुन पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार येऊ लागले. ते सर्वजण कारेगाव, रांजणगाव आणि ढोकसांगवी येथे भाड्याने खोल्या घेऊन राहु लागले. त्यामुळे स्थानिकांनी मोठया मोठया इमारती उभ्या केल्या. त्यांनाही भाड्याचे पैसे मिळू लागले. मात्र पैशाच्या हव्यासापोटी बाहेरुन येणाऱ्या कामगारांच्या चुकांकडे खोलीमालकांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला.

अवैध धंदे अन असुरक्षित चौक…

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारेगाव येथील यश इन चौकात अनेक गैरप्रकार चालतात अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. रात्री १० नंतर काही टवाळखोर तरुण याठिकाणी कामावरुन घरी जाणाऱ्या कामगार महिला तसेच तरुणींची छेड काढतात. त्यामुळे हा चौक आता असुरक्षित बनला असुन येथील सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची स्थानिकांनी तक्रार केली आहे.

(क्रमशः)

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

8 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

15 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

15 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

15 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

15 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

16 तास ago