आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा शुक्रवार कसा असेल

मेष: ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यामुळे तुमचे सहकारी हताश होणार आहेत. त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. रात्री पत्नीची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाणार आहे.

वृषभ: आजचा दिवस अत्यंत सुखात जाणार आहे. तुमचे नशिब बलवत्तर असून दुपारपर्यंत एखादी आनंदाची बातमी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही खूप काम करत आहात त्यात नियोजन महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थिती उत्तम असेल त्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहाभागी व्हाल, त्यामुळे तुमचा सन्मान वाढेल.

मिथुन: वडिलांच्या आशीर्वादाने तसचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेनं मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही कामात अधिकाधिक व्यस्त राहणार आहात. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. गाडीचा वापर करताना वेगावर नियंत्रण ठेवा. अती वेग घातक आहे हे लक्षात ठेवा. प्रियजनांचा पाठिंबा मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल. सासरकडून धनलाभ होण्याचा योग आहे.

कर्क: आज तुमचा राशी स्वामी उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे अचानक धनलाभाचे योग आहेत. बँक बॅलन्स वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा यात वाढ होईल. घाईगडबडीत आणि भावनांच्या आहारी जावून घेतलेले निर्णय त्रास देवू शकतात त्यामुळे निर्णय घेताना सतर्क राहा. सांयकाळी देवदर्शनाला जाणार आहात.

सिंह: सिंह राशीचे जे जातक राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना प्रत्येक कामात उत्तम यश आहे. मुलांच्या काही जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील. मुलांसाठी काही तरी खास केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाणार असून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तब्येत सांभाळा कारण तुमची पचन क्रिया आज अपसेट असणार आहे. डोळ्याचे आजारसुद्धा डोके वर काढतील. आहार आणि आराम याकडे खास लक्ष द्यायला हवे.

कन्या: आज व्यवसाय उद्योगात तुम्हाला खूप लाभ होणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करायला पुढे येईल. कुटुंबात सुख समाधान असेल. आज क्रिएटीव्ह कामात यश मिळेल. समजा आज विपरित परिस्थिती निर्माण झाली तर रागावर नियंत्रण ठेवाल. घरगुती समस्या सुटतील. राजकीय मदत देखील मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अचानक धनलाभाचे योग आहेत.

तूळ: आज शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तुमच्या प्रभावी बोलण्याचा उत्तम परिणाम होईल, तुमचा मान सन्मान वाढेल. आज धावपळ जास्त आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. जे काही काम कराल त्यात सावध राहा. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास लाभणार आहे. प्रवासाचा योग असून त्यातून लाभ होईल.

वृश्चिक: आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तसेच प्रत्येक कामात यश असून बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रियजनांची भेट झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर वादविवाद वाढतील. रात्री तुम्हाला भटकंतीची संधी मिळेल, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल.

धनु: आज तुम्ही शॉपिंग करणार आहात, खास करून गृहोपयोगी वस्तूंवर पैसे खर्च होतील. घरातील सुख सुविधा आज वाढतील. सहकारी किंवा एखाद्या व्यक्तीमुळे तणाव वाढू शकतो. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा कारण फसवणुकिची शक्यता आहे. काही कारणामुळे कोर्टकचेरीच्या चकरा माराव्या लागतील पण अखेरीस विजय तुमचात होईल. तुमच्या विरोधातील षडयंत्र अपयशी ठरेल.

मकर: आज व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे अनुकूल लाभ होईल, त्यामुळे आनंद गगनात मावेनासा असेल. आर्थिकस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. व्यवसायात परिवर्तनाची योजना आखणार आहात. स्पर्धा परीक्षा दिली असेल तर त्यात उत्तम यश आहे. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण होईल. प्रवासाचा योग आहे पण काही कारणाने तो पुढे ढकलला जाईल. वाहन चालवताना काळजी घ्या कारण अचानक त्यात बिघाड होईल, त्यामुळे खर्च वाढेल.

कुंभ: आज पत्नीला अचानक काही शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे धावपळ होईल, तसेच खर्चही अधिक होईल. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. सायंकाळी पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होईल, पूर्ण आराम मिळण्यात वेळ लागेल. तुम्ही ताणतणाव वाढू देवू नका, स्वतःची काळजी घ्या.

मीन: वैवाहिक जीवन आनंदात असेल, जवळचा किंवा दूरचा प्रवास होऊ शकतो. व्यापारातील बढती, प्रगती यामुळे आनंदाला उधाण येईल. विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून सुटका झाल्यामुळे तेपण समाधानी आणि आनंदी असतील. सायंकाळी भटकंती करताना एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. आज तुम्ही एकदम रिलॅक्स असाल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago