मेष: आज व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असेल. जर तुम्ही अलीकडेच एखाद्या क्लायंटला उधार दिले असेल, तर तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करू शकतो. टेक्सटाईल, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसायांमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करत राहणार आहात. नोकरीमध्ये कामाचा ताण अधिक असून तुम्हाला प्रोजेक्टे पूर्ण करण्यासाठी टीमकडून सहकार्य न मिळाल्याने तणाव वाढेल.
वृषभ: धनलाभाच्या संधी वाढणार आहेत. रिअल इस्टेट, विमा, शेअर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी नवीन प्रोजोक्ट किंवा डिल येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पेमेंट किंवा कमिशन आज मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत चालणारा व्यवसाय थोडा तणावपूर्ण असेल. आर्थिक व्यवहार लेखी स्वरूपात करणे शहाणपणाचे ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कार्यक्षमतेकडे वरिष्ठ लक्ष देतील, ज्यामुळे प्रमोशन किंवा बोनसची शक्यता आहे.
मिथुन: व्यवसायात नवीन डिल झाल्यामुळे उत्पन्नाचे मार्ग विस्तारीत होतील. परदेशात काम करणाऱ्या किंवा एक्सपोर्ट-इम्पोर्ट व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करणारे लोकांनी नियोजन अर्थात प्लॅनिंगकडे अधिक लक्ष द्यावे. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील, परंतु सहकाऱ्यांशी वाद टाळा. आर्थिकदृष्ट्या दिवस सकारात्मक आहे, गुंतवणूक करा.
कर्क: आज आर्थिकदृष्ट्या कर्क राशीसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील, विशेषतः जर तुम्ही कन्स्ट्रक्शन, हार्डवेअर किंवा तांत्रिक उपकरणांशी संबंधित असाल. एक जुना ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येऊ शकतो, ज्यामुळे मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. फ्रीलान्सर आणि कन्सल्टंट्सना मोठे प्रोजेक्ट मिळणार आहे. नोकरीमध्ये रिलोकेश किंवा नवीन प्रोजेक्टचा प्रस्ताव मिळेल.
सिंह: आज तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे नोकरी किंवा व्यवसायात तुमची प्रशंसा होणार आहे. व्यवसायात नवीन योजनांसाठी भांडवल उभारण्यात यश मिळेल. आज एखाद्या गुंतवणूकदाराकडून किंवा बँकेकडून आर्थिक कर्जाची मंजुरी मिळू शकते. नोकरीत बदली किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन डिल होणार आहे. भागीदारीत फायदा होईल, परंतु भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवा.
कन्या: आज नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. प्रमोशन किंवा वेतनवाढीबद्दल चर्चा होऊ शकते. खाजगी क्षेत्र, बँकिंग किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल. व्यापारी वर्गाने जर एखादी सरकारी निविदा केली असेल तर त्यात यश मिळेल. व्यवसायात खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः कर्मचाऱ्यांचे पगार तसेच त्यांना मिळणाऱ्या आर्थिक सुविधा. जर गुंतवणूक करायची असेल तर रिअल इस्टेटशी संबंधित प्लॉट किंवा व्यावसायिक मालमत्तेचा विचार करा.
तुळ: आज तुमचे बोलणे आणि संपर्क कौशल्य तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील, विशेषतः जर तुम्ही ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग किंवा मीडिया संबंधित असाल. नोकरीत तुमची स्थिती मजबूत होईल, तुमचे बॉस तुमच्या प्रेझेंटेशन किंवा रिपोर्टिंगवर खुश असतील. जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे.
वृश्चिक: आज व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे. जर तुम्ही मार्केटिंग, ऑनलाइन व्यवसाय किंवा डिजिटल मीडियाशी संबंधित असाल, तर नवीन रणनीतीने काम सुरू करा. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो ज्यामुळे विक्री वाढेल. ऑफिसमध्ये कामाचा थोडा दबाव असेल पण तुम्ही परिस्थिती व्यवस्थित सांभाळून घ्याल. घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घ्या. फ्रिलान्ससाठी वेळ उत्तम, मोठे प्रोजेक्ट मिळणार.
धनु: आज व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. परंतु, जर तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचा प्रचार कराल तर दिलासा मिळू शकतो. एखाद्या जुन्या मित्राकडून धनसंपत्ती संदर्भात मदत मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना थोडं मल्टीटास्किंग करावं लागेल पण घाबरु नका तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. क्रिएटिव्ह आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन डिल होणार आहे
मकर: आजचा दिवस खूप शुभ आहे. कोणतेही अडकलेले सरकारी काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. टेक्निकल, इंजिनियरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित व्यक्तींना मोठी डील मिळू शकते. नोकरीत नवीन पदभार किंवा पदोन्नतीचे योग आहेत. व्यावसायिक लोकांनी उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करावा.फायनान्स सेक्टरशी संबंधित लोकांसाठी लाभाचे योग आहेत.
कुंभ: आज ऑफिसचे वातावरण मानसिकदृष्ट्या उत्तम असेल. टीमवर्कद्वारे एखाद्या कठीण प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. नोकरदार लोकांना एखादा बोनस किंवा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी सोशल मीडियाशी संबंधित जाहिरातींमध्ये गुंतवणूक करा तुम्हाला लाभ होईल. व्यापार विस्ताराची योजना यशस्वी होऊ शकते. एखाद्या जुन्या क्लायंटशी पुन्हा डील फायनल होण्याचे योग आहेत.
मीन: आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असेल. कामाचा दबाव राहणार आहे. दरम्यान, तुम्ही वेळेचा योग्य वापर केला तसेच व्यवस्थित रणनीती आखली तर दिवस सकारात्मक असेल. व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रीत करावे. हॉटेल, केटरिंग, आयुर्वेद किंवा अध्यात्माशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. ऑफिसमध्ये बदली किंवा विभागीय बदलाची चर्चा शक्य आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…