महाराष्ट्र

शिवसेनेचा बाप काढणाऱ्या त्या भाजप आमदारावर शिंदेसेना नाराज

भंडारा: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल प्रत्येकजण आदराने बोलतात. परंतु भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण शिवसेनेचा बाप असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना कार्यकर्ते दुखावले आहेत. फुके यांनी १२ तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आम्ही शिवसेनाशैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

भंडारा येथील विश्राम भवनात रविवारी याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना लोकसभाप्रमुख संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. कुणीही बळजबरीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे, अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे, हे आम्ही सांगू, असा इशाराही कुंभलकर यांनी दिला.

पत्रपरिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपप्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा उपप्रमुख विजय काटेखाये, दीपक गजभिये, प्रकाश मालगावे, मनोज साकुरे, देवराज बावनकर, बंडू हटवार उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago