आरोग्य

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण मिळावे यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. कारण वेळेवर न जेवण, पोषक घटकांचा अभाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. शारीरिक आरोग्य चांगले ठेवणं त्वचा आणि केसांची साठी उत्तम ठरते.

केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता. पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने केसांना फाटे फुटणं, केस कोरडे होणं या समस्या उद्भवत नाही. आल्याचे पाणी, आल्याचे पाणी, रोज प्यायल्याने शरीराला हेल्दी ठेवू शकता. आल्यात मध मिसळून प्यायल्याने केस नैसर्गिकरित्या काळे राहतील.

१) आल: उंदरांवर केलेल्या एका संशोधनात केसांच्या वाढीसाठी आलं प्रभावी असल्याचे दिसून आले. आलं एक उत्तम हर्ब ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आल्याचा चहा, आल्याचे पाणी रोज प्यायल्याने शरीर हेल्दी ठेवता येते. आल्यात मध मिसळून प्यायल्याने तुम्ही काळेभोर-लांब केस मिळवू शकता.

२) आवळा: आवळ्याला एक सुपरफूड असे म्हटले जाते. आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या टाळता येतात. आवळा केसांना काळे करण्यासाठी, केस गळणं रोखण्यासाठी उत्तम ठरतो. आवळ्याचा हेअर पॅकही तुम्ही केसांना लावू शकता. मेडिकल न्यूज टु डे नुसार आवळ्यामुळे केस गळणं थांबवण्याबरोबरच कोंडा होणं, कोरडा स्काल्प, फंगल इन्फेक्शनचा बचाव होतो. केसांचा नैसर्गिक रंगही टिकून राहतो.

३) गाजर: गाजर व्हिटामीन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. गाजरात व्हिटामीन ए आणि व्हिटामीन ई यांसारखे पोषक तत्व असतात. रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने केस गळण्याचा त्रास होत नाही आणि केसांची मूळं मजबूत होतात.

४) अश्वगंधा: अश्वगंधा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. रोज अश्वगंधा पावडरचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. रोज अश्वगंधा पावडर दूधाबरोबर मिसळून प्यायल्याने केस काळेभोर राहण्यास मदत होते.

५) ड्रायफ्रुट्स: केसांची लांबी आणि गुणवत्ता सुधारायची असेल तर तुम्ही बदाम, काजू, अक्रोड आणि तुमच्या आवडत्या पदार्थांचा आहारात समावेश करू सकता. यात बायोटीन म्हणजेच व्हिटामीन बी-७ असते. जे केसांना लांब आणि दाट बनवण्यास मदत करतात. नट्स हार्ट डिसीज आणि शरीरात सूज तयार होण्याचा धोका कमी करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

33 मिनिटे ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

40 मिनिटे ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

1 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

1 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

15 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

15 तास ago