महाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते विजय सावंत, राहुल जगताप यांच्यासह अनेक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनतर्फे देण्यात येणारा ‘लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर विजय सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“हा माझा एकट्याचा सन्मान नसून, ज्या संस्थेने आपल्या शाळेत मला शिकविण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या सोशल सर्व्हिस लीग संस्थेचा आणि पर्यायाने माझ्या विद्यार्थ्यांचा तसेच सहकारी शिक्षकांचाही हा सन्मान आहे,” असे सावंत यांनी सांगितले.

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “रात्रशाळेत येणारे विद्यार्थी वयाने मोठे असतात. दिवसभर कुठेतरी काम करत असताना अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन ते रात्रशाळेत प्रवेश घेतात. मोठे होण्याची स्वप्ने उराशी बाळगून ते शिक्षण घेतात आणि यशस्वीही होतात.”या कार्यक्रमाला विजय परदेशी यांच्यासह विविध पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरावर इंग्रजी विषयासाठी योगदान

विजय सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रळ गावचे सुपुत्र असून व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी SCERT पुणे, MEPA औरंगाबाद, RAA औरंगाबाद आणि नाशिक यांसह विविध ठिकाणी राज्यस्तरावर इंग्रजी तसेच इतर विषयांसाठी काम केले आहे.

पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोड तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

सावंत यांच्या साहित्यिक योगदानाचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यांचे ‘प्रकाश किरणाच्या शोधात’ आणि ‘जगण्याचे आर्त’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा ‘धाकावयले कावळे’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.यापूर्वी त्यांना एकता कल्चरल अकादमी, मुंबईचा ‘महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’, अहिल्या शिक्षण संस्थेचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ आणि लक्ष्मी शिक्षण संस्थेचा ‘साने गुरुजी पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

33 मिनिटे ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

35 मिनिटे ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

1 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

1 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

15 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

15 तास ago