आरोग्य

हळदीचं पाणी की हळदीचं दूध प्यावे? कशानं मिळतात जास्त फायदे घ्या जाणून…

घरांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हळद फक्त अन्नाला रंग देत नाही तर जेवणाची चवही वाढवते. हळदीचे सेवन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरते. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स पाण्यात हळद मिसळून ते पाणी पिण्याचा किंवा दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाबरोबरच हळदीचे पाणी प्यायल्यानं ही तब्येतीला बरेच फायदे मिळतात.

डॉक्टर सांगतात की, हळदीत करक्युमिनअसते. जे एक पॉवरफुल एंटी इंफ्लेमेटरी कंम्पाऊंड आहे. करक्युमिन सांध्यांतील वेदना सूज कमी करते. अनेकचा याचा परीणाम इबुप्रोफेन आणि एस्पिरिन यांसारख्या औषधांप्रमाणे असतो पण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. अनेक संशोधनांतून समोर आले आहे की हळद ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. खासकरून टाईप २ डायबिटीस असल्यास रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. हे शरीरात मेटाफॉर्मिन सांरख्या औषधांप्रमाणे काम करते. कोणत्याही नुकसानांशिवाय खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

करक्युमिन सेरोटोनिन आणि डोपामाईन यांसारखे हॅप्पी हॉर्मोन्स वाढवतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो चांगली झोप येते. म्हणून हळदीचं पाणी मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. हळदीचं पाणी प्यायल्यानं पचनक्रिया मजबूत होते. गॅस, एसिडिटी यांसारख्या समस्या कमी होता. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात याशिवाय इम्यून सिस्टीम मजबूत होते.

एक ग्लास हलक्या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि चुटकीभर काळी मिरी मिसळा. तुम्ही चवीसाठी थोडा लिंबू किंवा मध घालू शकता. हळूहळू याचे सेवन करा. काळी मिरी हळदीतील पोषक तत्व योग्य पद्धतीनं शोषण्यास मदत करते.

हळदीचं पाणी कधी प्यावं?
– जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर जेवणाच्या आधी प्या. झोप, इम्यूनिटीशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपण्याच्या आधी हे पाणी प्या.
– हळदीचं पाणी शरीराला आतून डिटॉक्स करते, सूज कमी करते, मन शांत ठेवते, इम्यूनिटी वाढवते. पण कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

आरोग्यदायी काळे मनुके

उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

वजन वाढवण्यासाठी काय खावे

झोप येत नाही मग हे करून पहाच

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago