आरोग्य

बेडशीट किती दिवसांनी बदलावी, स्किन इंफेक्शनचा वाढतो धोका; ‘अशी’ करा स्वच्छ

प्रत्येक घरात दररोज बेडशीटचा वापर केला जातो, परंतु लोक त्याच्या स्वच्छतेबाबत अनेकदा निष्काळजी असतात. बेडशीट ही केवळ घर सजावटीचा एक भाग नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर बेडशीट वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यामुळे अनेक प्रकारचं स्किन इंफेक्शन आणि ऍलर्जी होऊ शकते.

बेडशीटची नियमित स्वच्छता केल्याने तुमची त्वचा चांगली राहते, नीट झोप लागते आणि आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही जर बेडशीट बदलायला कंटाळा करत असाल तर ही सवय आताच बदला आणि आपल्यासह कुटुंबीयांचं आरोग्य सांभाळा. स्वच्छ, सुंदर बेडशीटमुळे निरोगी राहाल आणि मनाला देखील प्रसन्न वाटेल.

बेडशीट किती दिवसांनी बदलावी

दर ७ दिवसांनी बेडशीट बदलल्या पाहिजेत. जर तुम्ही धूळ, घाण किंवा घामाने भरलेल्या वातावरणात काम करत असाल तर बेडशीट ३-४ दिवसांत बदलणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात घामामुळे बेडशीटवर बॅक्टेरिया आणि फंगस वेगाने वाढू शकतात. त्याच वेळी, हिवाळ्यातही धूळ आणि डेड स्कीन जमा होण्याची शक्यता असते.

बेडशीट खराब असल्यास काय होतं नुकसान

घाणेरड्या बेडशीटमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस जमा होतात, ज्यामुळे स्किन इंफेक्शन, खाज आणि पुरळ येऊ शकतात. धूळ आणि घाणीने भरलेल्या बेडशीट्समुळे अ‍ॅलर्जी आणि दमा यांसारखे श्वसनाचे आजार वाढू शकतात. आरामदायी झोपेसाठी स्वच्छ बेडशीट्स आवश्यक आहेत. घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त बेडशीट झोपेत अडथळा आणू शकतात.

बेडशीट कधी धुवावी

बेडशीट आणि उशांचे कव्हर हे घरातील धूळ किंवा काही कारणाने खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ते नक्की धुवावेत.

बेडशीट्स अशा करा स्वच्छ 

बेडशीट धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा आणि दर आठवड्याला ती धुवा. बॅक्टेरिया आणि फंगस पूर्णपणे नष्ट होण्यासाठी गरम पाणी वापरा. त्या उन्हात वाळवल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर होते. प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या बेडशीट्स वापरा. उन्हाळ्यात हलक्या आणि सुती कापडाच्या बेडशीट्स निवडा आणि हिवाळ्यात जाड आणि उबदार कापडाच्या बेडशीट्स निवडा. बेडशीट्ससोबतच उशांचे कव्हर आणि ब्लँकेटची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. आठवड्यातून एकदा तरी आठवणीने धुवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

10 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

10 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

10 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

19 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

19 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

19 तास ago