आरोग्य

मेंदूची ताकद वाढवणारे पाहा सोपे व्यायाम, ताण होतो कमी-वाढतो कामावरचा फोकस

आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. आपण नेहमीच ऐकत असतो की, फिजिकल अ‍ॅक्टिविटीनं फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थवरही प्रभाव पडतो. फिजिकल अ‍ॅक्टिविटी जसे की, एक्सरसाईज, जिम, चालणं किंवा धावणं या गोष्टीही आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर मेंटल हेल्थ चांगली राहण्यासोबतच स्ट्रेस, मूड स्वींग, डिप्रेशन, चिंता, एडीएचडीसारख्या मानसिक समस्यांपासूनही सुटका मिळते. सोबतच झोपेची क्वालिटीही सुधारते.

स्ट्रेस कंट्रोल होतो

धावणं, सायकल चालवणं, स्वीमिंग यांसारख्या फिजिकल अ‍ॅक्टिविटी मेंदुमध्ये एंडॉर्फिन आणि सेराटोनिन सारखे हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स तणाव आणि चिंता कमी करतात. ज्यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहते. मनाला शांतता मिळते आणि संतुलन जाणवतं.

मेंदुची क्षमता वाढते

रोज फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यास मेंदुतील महत्वाचे भाग जसे की, हिपोकॅम्पस नवीन न्यूरॉन्स बनवण्याचं काम करतात. रोज एखादी एक्सरसाईज केल्यास मेंदुची क्षमताही वाढते.

मूड चांगला होतो

एक्सरसाईज केल्यानं मेंदुमध्ये डोपामाइन, सेराटोनिन आणि नॉरएपिनफ्रिन सारखे न्यूरोट्रान्समीटरची लेव्हल वाढते. जे मानसिक आरोग्यासाठी गरजेचे असतात. याचा थेट प्रभाव तुमच्या मूडवर पडतो. तुम्हाला जास्त आनंदी आणि उत्साही वाढतं. तुमचा तणावही कमी होतो.

चांगली झोप

रोज काहीना काही फिजिकल अ‍ॅक्टिविटी केली तर झोपेची क्वालिटी सुधारण्यास मदत मिळते. फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यानं शरीर थकतं आणि त्यामुळे गाढ झोप येते.

डिप्रेशन आणि एंग्झायटी होईल कमी 

खासरून डिप्रेशन आणि एंग्झायटीच्या केसमध्ये. फिजिकल अ‍ॅक्टिविटी केल्यास शरीरात तणाव कमी करणारे केमिकल्स वाढतात. ज्यामुळे डिप्रेशन, चिंता दूर होते.

कामावर फोकस वाढतो

जेव्हा तुम्ही एखादी फिजिकल अ‍ॅक्टिविटी करता, तेव्हा शरीर आणि मेंदू दोन्ही अ‍ॅक्टिव असतात. यामुळे मानसिक आरोग्यात सुधारणा होते, ज्यामुळे अधिक लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते. अशात तुम्ही तुमची कामं अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

9 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

9 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

9 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

18 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

18 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

18 तास ago