आरोग्य

कानाची काळजी कशी घ्यावी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की हैराण करतात. कानदुखीचा अनुभव हा बहुतेक प्रत्येकाने सोसलेला असतोच. कानाच्या विकारांवरही घरच्या घरी सोपे उपाय करता येतात.

१)कान दुखणे: गरम पाण्याच्या पिशवीने कान शेकावा. तेल घालू नये

२) कानात काही गेल्यास: पाखरू, तुकडा, काडी मोडणे कानात गेलेली वस्तू शक्यतो आपसूकच बाहेर येते असते. पण काडी वगैरे अडकून बसल्यास तज्ञ डॉक्टरांकडून काढून आणावी. आपणच कान कोरणे वगैरे प्रकार करून नयेत.

3) कान फुटणे: नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा हा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय करावेत.

४) कानात दडे बसणे: कान शेकावा अथवा कोणत्याही उपायाने शिंका काढाव्यात. त्यामुळे कानातले दडे कमी होतील.

5) कानात मळ साठल्यास: कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपाआप बाहेर पडतो.काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.

६) कान चिघळणे: बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.

7) कान खाजणे: कान कोरडा पडून खाजत असल्यास कापसाने आतून तेलाचा लेप लावावा.तेल कानात ओतू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago