आरोग्य

ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या मग हे उपाय नक्की करा

आपल्या त्वचेला हल्ली नेहमीच धूळ, प्रदूषण, ऊन या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि कमी वयातच मग चेहरा सुरकुतलेला, वयस्कर झाल्यासारखा दिसू लागतो. असं होऊ नये आणि त्वचेचं सौंदर्य अधिक काळ टिकून राहावं म्हणून या काही गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता.

त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. आपण घरातच आहोत, उन्हात जात नाही. मग सनस्क्रीन लोशनची काय गरज असं म्हणू नका. एसपीएफ ४० किंवा त्यापेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन नियमितपणे चेहऱ्याला वाला. तुमची त्वचा नेहमीच मॉइश्चराईज ठेवण्याचा प्रयत्न करा.

त्यासाठी चांगल्या दर्जाचं मॉईश्चरायझर घ्या आणि ते दिवसातून दोन वेळा तरी चेहरा स्वच्छ धुवून लावा.

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नाईट केअर रुटीन अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी साधं खोबरेल तेलाचे काही थेंब हातावर घेऊन त्वचेला हलक्या हाताने मालिश केली तरी चालेल. यामुळे रात्रभर त्वचेला छान पोषण मिळेल. तुम्ही यासाठी साजूक तूप, बदाम तेल यांचाही वापर करू शकता.

तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देणारी फळं आणि भाज्या तसेच सुकामेवा असू द्या, असं सौंदर्यतज्ज्ञ मोनिका कपूर सांगतात.

व्हिटॅमिन सी असणारच स्क्रब, व्हिटॅमिन सी सिरम या गोष्टींनी तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. लिंबू, संत्री, पपई यांच्यामध्येही व्हिटॅमिन सी असते. त्याचा वापर करून घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावला तरी चालेल.

पुरेशी झोप घ्या. आरोग्यासाठी झोप जशी गरजेचे आहे, तसंच सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहे.

योग्य प्रमाणात पाणी प्या. त्यामुळे संपूर्ण शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहाते. ड्राय होत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

41 मिनिटे ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

7 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

15 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

1 दिवस ago