किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. कारण ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. आज ओव्याने होणाऱ्या काही फायदेशीर गोष्टींवर नजर टाकुयात
सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो.
हृदयासंबंधित अनेक आजारांवर ओव्याचे पाणी फायदेशीर आहे.
दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.
ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.
सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.
तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.
तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.
पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होईल.
निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…