आरोग्य

छातीत जळजळ-आंबट ढेकर येतात तर मग ताकात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ॲसिडिटीवर लगेच आराम मिळेल

ॲसिडिटीची ही समस्या खूपच सामान्य आहे. ॲसिडिटी अनेक कारणांमुळे होते. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे ॲसिडिटी होते. कोणी या उपायासाठी औषधं घेतं तर कोणी घरगुती उपाय करते. एक घरगुती उपाय करून तुम्ही ॲसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. लाईफस्टाईल एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टग्रामवर याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे.

ॲसिडिटी दूर करण्यासाठी हे ड्रिंक प्या

ताकात चिया सिड्स मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. एक ग्लास ताकात एक छोटा चमचा चिया सिड्स मिसळून पिऊ शकता. ताकातील लॅक्टीक एसिड पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

लॅक्टिक ॲसिड एक नॅच्युरल आम्ल आहे. जे पोटातील अतिरिक्त एसिड संतुलित करते आणि पचनक्रिया चांगली राहते. हे एसिड रिफ्लेक्ससारख्या समस्या कमी करण्यास मदत करते ज्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होते.

चिया सिड्स ताकात मिसळून प्यायल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. यात फायबर्सचे उच्च प्रमाण असते. ओमेगा फॅटी एसिड आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटातील एसिड वर जाण्यापासून रोखता येते. पोटातील एसिड लिकिंग कमी करण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

3 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

3 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

11 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

12 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

12 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago