आरोग्य

थकवा येण्याचे कारण व उपाय

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही. तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते तसा आळस वाढत असतो. हा आळस म्हणजेच थकवा असतो. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारे थकवा असतो. आराम करून शारीरिक थकान चटकन आपण घालवू शकतो. मात्र मानसिक थकवा घालविण्यासाठी खूप अवधी लागत असतो. थकवा हा कोणत्या प्रकारचा आहे. हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र हा थकावा कशामुळे आला आहे. त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक असते.

झोप लवकर का लागते

जास्त प्रमाणात अंग मेहनत करणे, व्यायाम करणे.

झोप पूर्ण न होणे.

अधिक तनावात राहणे.

शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा.

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असणे.

थकव्याची लक्षणे

हिवाळ्यात अधिक थकवा येत असल्याने उत्साह कमी होतो. त्यामुळे थकव्याची लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.

कामात मन न लागणे. नकारात्मक विचारामध्ये वाढ होणे.

अशक्तपणा येणे, दिवसरात्र झोप लागणे.

थकवा दूर करण्याचे उपाय

हिवाळयात उन्हात उभे राहिल्याने शरीरात स्फूर्ति येत असते. थकवाही हळू हळू कमी होत असतो.

हाताच्या दोन बोटांनी चेहर्‍यावर हलकीशी मालिश करावी. तसे केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच मन व शरीरावरील ताण कमी होतो.

सुगंधित तेलाने शरीराची‍ मालिश केल्यानेही थकवा दूर केला जातो.

दररोज योग अथवा व्यायाम करावा, मात्र अति व्यायाम केल्याने ही थकवा येतो.

किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

12 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

13 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago