आरोग्य

बर्फाच्या बाटलीचा शेक योग्य की अयोग्य

शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात आता सोशल मीडियावर तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाची बाटली पायाखाली फिरवण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे तळपायांमधील वेदना कमी होतात, असे म्हटले जाते. पण, खरेच हा उपाय वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का यावर आम्ही डॉक्टरांची मते जाणून घेतली.

ज्यांना शरीरातील एखाद्या अवयवात जाणवणाऱ्या तीव्र वेदनांपासून त्वरित आराम मिळवायचा असेल, तर बर्फाच्या बाटलीचा वापर करणे हा एक उत्तम उपाय असू शकतो. पाय मुरगळणे, फ्रॅक्चर, स्नायू दुखणे, सूज येणे, मुका मार यांसारखी तीव्र वेदनादायी दुखापत झाली असेल, तर त्यांच्यासाठीही बर्फाच्या बाटलीचा शेक हा उपाय फायदेशीर आहे. दुखापत झालेल्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी बर्फाचा शेक दिला जातो. असा बर्फाचा शेक दिल्यामुळे ती दुखापतग्रस्त जागा सुन्न होण्यास आणि वेदनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. रोलिंग मोशन म्हणजे तुम्ही बर्फाची बाटली जेव्हा दुखापत झालेल्या ठिकाणी फिरवता तेव्हा स्नायूंवरील ताण कमी करण्यास मदत होते.

विशेष म्हणजे बर्फामुळे जखमी ऊतींमधील पेशींची क्रिया कमी होते, ज्यामुळे ऊतींचे नुकसान व जळजळ कमी होते. बर्फातील थंडाव्यामुळे मज्जातंतूंच्या सिग्नलची गती कमी होते, ज्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या वेदना कमी झाल्यासारखे वाटते. विशेषत: खेळाडूंना खेळताना अनेकदा दुखापत होत असते. खेळताना त्यांना अधिक शारीरिक ताण असतो. पण हाच ताण दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाच्या बाटलीने रोलिंग मोशन करणे उपयुक्त ठरू शकते.

तीव्र दुखापतीनंतर किंवा जुनाट वेदना वाढल्यास त्या कमी करण्यासाठी पहिल्या ४८ तासांत बर्फाच्या बाटलीने शेक द्या, एखादी दुखापत झाल्यानंतर कधीही गरम पाण्याने शेक देण्याचा किंवा कोणत्या हॉट पॅकचा वापर करू नका. कारण- दुखापतीमुळे आधीच सूज आलेली असते, त्यात तुम्ही गरम पाण्याचा शेक दिल्यास जळजळ वाढू शकते. अशा वेळी बर्फाच्या बाटलीने शेक दिल्यास आराम मिळू शकतो.

बर्फाच्या बाटलीचा शेक कशा प्रकारे द्यायचा

१) एक प्लास्टिकची पाण्याची बाटली तीन-चतुर्थांश पाणी भरा.

२) झाकण न लावता ती बाटली फ्रिजरमध्ये ठेवा.

३) पाण्याची बाटली बर्फाने गोठताच बाहेर काढा. आता बाटलीला झाकण लावा.

४) त्यानंतर बाटली तळपायाखाली ठेवा आणि पायाने हळुवारपणे फिरवा. पायाने ती रोलिंग करा.

पण, हा उपाय प्रत्येकासाठीच प्रभावी ठरू शकत नाही. विशेषतः दीर्घकालीन वेदना किंवा आजारांच्या बाबतीत हा उपाय प्रभावी ठरेलच, असे नाही. पण, हा उपाय ठरावीक वेळाने सतत केल्यास फायदेशीर वाटू शकतो; पण याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

बर्फाची बाटली त्वचेवर थेट जास्त काळ ठेवल्याने नसांमध्ये जळजळ जाणवू शकते. अशाने त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि आईस बर्न होऊ शकते. बर्फाच्या बाटलीचा शेक देणे कितीही चांगले वाटत असले तरी ठरावीक वेळ करणेच योग्य ठरू शकते. १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ याचा पद्धतीचा वापरू नका किंवा करीत असल्यास मधे मधे ब्रेक घ्या. त्वचेला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी बर्फाची बाटली थेट त्वचेवर फिरविण्यासाठी तुम्ही कापड किंवा टॉवेलचा वापर करू शकता. पण, वेदना अधिक जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

3 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

3 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

22 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago