महाराष्ट्र

नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये काँग्रेसचा उद्या बुधवारी ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार

मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदानात मोठा घोळ करून सत्ता मिळवली आहे. या मतचोरीची पोलखोल काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. भाजपाच्या या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून नागपूर जिल्ह्यातील कामठी मध्ये उद्या बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

कामठी येथील मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतचोरी झाल्याचा संशय बळावला होता. महाराष्ट्रातील मतचोरीसह देशभरातील विविध मतदारसंघात मतचोरी केल्याचा पर्दाफाश राहुल गांधी यांनी केला. यात कामठी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात झालेल्या बोगस मतदार नोंदणीही उघड करण्यात आली. या मतचोरीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय मेळावे आयोजित करण्य़ाचा निर्णय घेतला असून उद्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघात हा राज्यस्तरिय मेळावा होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago