आरोग्य

पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते.

शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते

रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कॅल्शियमच्या सेवननाने हाय बीपी कंट्रोल होण्यास मदत होते. अनेकांना दूधाची एलर्जी असते तर काहीजणांना दूध प्यायला जराही आवडत नाही, अशावेळी तुम्ही दुधापेक्षा अधिक कॅल्शियम देणारे पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकता.

कॅल्शियमसाठी काय खायच

कॅल्शियम दूध, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर असते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार दुग्धजन्य पदार्थांशिवाय इतर पदार्थांमध्येही भरपूर कॅल्शियम असते. जसं की भाज्या, ड्रायफ्रुट्स यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

सुक अंजिर: २ सुकलेल्या अंजीरमध्ये जवळपास ६५ मिलीग्राम कॅल्शिमयम असते. तुम्ही ओटमीलवरही सुके अंजिर घालू शकता किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता. पनीरमध्ये किंवा पिज्जा टॉपिंग्समध्ये वापरले जाते.

प्लांट मिल्क: गाईचे दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. बदाम, तांदूळ किंवा सोयापासून तयार केलेले पदार्थ फोर्टिफाईड केले जातात. जेणेकरून कॅल्शियमचा स्तर गाईच्या दूधाप्रमाणे असेल.

टोफू: आशियाई पदार्थांमध्ये टोफूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ४ औंस टोफूमध्ये ४३० मिलीग्राम कॅल्शियम असते. हे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.

बदाम: बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. 2 चमचे बदामाच्या बटरमध्ये १११ मिलीग्राम कॅल्शियम असते. हा प्रोटीनसचा तगडा स्त्रोत आहे. ओट्स, खीर किंवा दूधात घालून तुम्ही बदामाचे सेवन करू शकता.

चवळी: चवळीच्या पांढऱ्या बीयांमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण भरपूर असते. यात कॅलरीज खूप कमी असतात. याव्यतिरिक्त चवळी फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. एक कप पांढऱ्या चवळीमध्ये जवळपास १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. याशिवाय काजू, खजूर, पालक, दही या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago