आरोग्य

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे, किंवा संसर्गामुळे होते. अशा वेळी घसा जळजळतो. खवखवतो आणि बोलताना किंवा खाता-पिताना प्रचंड वेदना होतात. सुरुवातीला ही समस्या सामान्य वाटते, पण दुर्लक्ष केल्यास ती वाढू शकते आणि औषधांची गरज लागू शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य घरगुती उपाय करायचे. त्यामुळे त्रास कमी होतो आणि आराम मिळतो. तसेच पुढे दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत.

घसा दुखत असेल, सोलवटलेला वाटत असेल तर सर्वात आधी गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा उपाय आपण सारेच करतो. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या केल्याने घशाची सूज कमी होते. तेथील जंतू नष्ट होतात. हळद आणि दूध हे त्रासावर रामबाण औषध मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून ते दूध प्यायचे. हळदीतील अँण्टीसेप्टिक गुणधर्म घशातली जळजळ शांत करतात आणि झोपही लागते.

तुळस आणि आल्याचा काढा तयार करून प्यायल्यास घशाला खूप आराम मिळतो. या काढ्यासाठी पाण्यात तुळशीची पाने, आल्याचा तुकडा, थोडी काळीमिरी आणि गवती चहा घालून उकळायचे. हा काढा दिवसातून एक किंवा दोन वेळा घेतल्यास घशाची सूज कमी होते. आल्याचा रस आणि मध यांचं मिश्रण घेतल्यासही घसा मोकळा होतो. एक चमचा मधात थोडा आल्याचा रस घालून ते थोडं थोडं करून चाटा. त्यामुळे घशाचा कोरडेपणा राहत नाही आणि सततचा त्रास कमी होतो.

वाफ घेणे हाही एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात थोडं मिंट ऑईल किंवा ओवा टाकून घेतलेली वाफ घशातील बंद जागा मोकळ्या करते. वाफ घेतल्याने सर्दी, खवखव दूर होण्यास मदत होते. खूप थंड पदार्थ, बर्फाचे पाणी किंवा आइसक्रीम टाळाणे महत्वाचे आहे. तसेच उष्ण गरमागरम आहार घ्यावा. गरम सूप, मूगडाळीचे वरण, खिचडी असे पदार्थ खायचे. घशाला आराम मिळतो आणि पचनासाठीही ते सोपे असतात.

घसा दुखणं सामान्य असलं तरी काही वेळा ही लक्षणे तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास किंवा ताप, अन्न-पाणी घेता न येणं, सततचा त्रास जाणवायला लागल्यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. पण घरच्या घरी केलेले हे साधे उपाय नियमितपणे केले तर त्रास लवकर कमी होतो आणि पुन्हा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

60 मिनिटे ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

1 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

1 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

1 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

1 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago