आरोग्य

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार:

सकाळचा नाश्ता:

फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा.

मीठाचे प्रमाण कमी करा:

जास्त मीठ खाणे टाळा, कारण ते रक्तदाब वाढवते.

तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा:

यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

नियमित जेवण:

वेळेवर आणि संतुलित आहार घ्या.

पुरेशे पाणी प्या:

शरीराला हायड्रेटेड ठेवा.

नियमित व्यायाम:

चालणे, जॉगिंग, पोहणे यांसारख्या ऍरोबिक व्यायामांचा नियमित समावेश करा.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा:

हे दोन्ही हृदयविकारांसाठी धोकादायक आहेत.

पुरेशी झोप घ्या:

दिवसातून 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

तणाव कमी करा:

योग, ध्यान किंवा इतर विश्रांतीचे तंत्र शिका.

वजन नियंत्रणात ठेवा:

जास्त वजन किंवा लठ्ठपणा हृदयविकारांसाठी धोकादायक आहे.

नैसर्गिक उपचार: 

लसूण:

लसणामध्ये हृदयविकारांसाठी फायदेशीर घटक असतात. दररोज सकाळी 1-2 पाकळ्या लसूण खाण्याचा प्रयत्न करा.

तुळस:

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तुळशीची पाने चहामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकता.

मेथी:

मेथीचे दाणे भिजवून ते पाणी प्या किंवा भाजीमध्ये वापरू शकता.

हळद:

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असते, जे हृदयविकारांसाठी फायदेशीर आहे.

तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्यास हृदय निरोगी राहतं. दररोज रिकाम्या पोटी तुळशीचं दूध प्यायल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना भरपूर फायदा होतो.

तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्यास हृदय निरोगी राहतं. दररोज रिकाम्या पोटी तुळशीचं दूध प्यायल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना भरपूर फायदा होतो.

हृदय निरोगी असेल तर अनेक गोष्टींवर आपण मात करू शकतो. मात्र सध्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हृदय निरोगी ठेवण्याचे काही सहज आणि सोप्पे उपाय सांगितले आहेत.

शारीरिक कार्य: जास्त वेळ बसून राहणं हे धुम्रपाना इतकंच हानिकारक आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात किमान ३० ते ४५ मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. तसंच आठवड्याला ५ ते ६ दिवस काम करणं आवश्यक आहे. यामध्ये चालणं, सायकलिंग, पोहणं किंवा धावणं यांसारख्या व्यायामांचा समावेश करा.

डाएट: असं म्हटलं जातं की, मनुष्याच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो. म्हणूनच हृदयाचे अनेक आजार हे पोटामुळे होतात. त्यामुळे जंक फूड, लोणी, चीज, फास्ट फूड आणि डेझर्ट खाण्यावर निर्बंध घातले पाहीजेत. या गोष्टी खाणं पूर्णपणे बंद करणं ही काळाची गरज आहे. फळं आणि भाज्या- आपण काय खाऊ नये याच्यासोबतच, आपण कोणत्या गोष्टी योग्य प्रमाणात खाव्यात याचा विचार करणंही महत्त्वाचं आहे.

हृदयाचे आजार रोखण्यासाठी दररोज २ ते ३ फळं आणि किमान वाटीभर वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. फळांचा रस घेण्यापेक्षा ताजी फळं खाण्यावर जोर असावा. तसेच भाज्या जास्त प्रमाणात शिजवू नये, त्यामुळे त्यातील जीवनसत्त्व नाहीसे होतात.

योग आणि ध्यान- नियमित योग आणि ध्यानमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच मानसिक ताण आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते.

तंबाखूचं सेवन थांबवा- तंबाखूचा उपयोग सिगरेट, विडी, चघळण्यासाठी, ब्रश किंवा पानमध्ये केला जातो. तंबाखू सेवन थेट हृदयरोगाची निगडित आहे. त्यामुळे तंबाखूचं सेवन सोडवणं फार आवश्यक आहे.

अल्कोहोलचे सेवन बंद करा- विशिष्ट मर्यादेपर्यंत, अल्कोहोलचे हृदयाला फायदे होतात. मात्र, त्याहून जास्त अल्कोहोल शरीराला अत्यंत घातक आहे. पुरुषांसाठी दिवसाला २ ग्लास पेय आणि स्त्रियांसाठी १ ग्लास पेय चालते. १ ग्लास पेय म्हणजे २५ मि.ली. व्हिस्की, ब्रँडी, वोडका चालतो. तसेच १२५ मि.ली. वाइन किंवा ३४० मि.ली. बियर घेऊ शकता. या पलीकडे अल्कोहोलचे सेवन शरीराला घातक आहे.

व्यायाम- योग्य व्यायाम करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करत असाल किंवा मॅरेथॉनमध्ये धावत असाल तर सुरूवातीलाच हृदयाच्या सर्व चाचण्या करुन घेणं आवश्यक आहे. अचानक फिटनेसची कोणतीही गोष्ट सुरू करू नका. याचा हृदयावर फार घातक परिणाम होऊ शकतो.

ताण कमी ठेवणं- धकाधकीच्या आयुष्यात मनावरचा ताण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. मनावरचा ताण टाळण्यासाठी तुम्हाला आवडेल ते काम करा. एखादा छंद जोपासा. संगीत ऐकणं, कुटुंबासह वेळ घालवणं, लाँग ड्राइव्हला जाणं, सिनेमा- नाटक पाहणं किंवा समुद्री चौपाटीवर बसणं… तुम्हाला ज्याची आवड आहे ते वेळातवेळ काढून नियमितपणे करा.

मानसिक आरोग्य- आपण नेहमी शारीरिक स्वास्थ्याकडे अधिक लक्ष देतो आणि मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. हृदयविकाराच्या अनेक कारणांपैकी मानसिक् स्वास्थ्य हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. कामाच्या दबावामुळे आणि कमी होत चाललेल्या कौटुंबिक वेळेमुळे मनावरचा ताण वाढतच चालला आहे. मानसिक रोगाशी निगडित समस्यांवर उपचार करण्यासाठी मनोवैज्ञानिक आणि मानसोपचार तज्ज्ञांची वेळीच मदत घ्यावी.

नियमित तपासणी- उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टरॉल हे त्रिकूट अनेक रोगांचं कारण आहे. त्यामुळेच या रोगांची नियमित तपासणी करत राहणं आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

25 मिनिटे ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

31 मिनिटे ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

38 मिनिटे ago

डीजेच्या गोंगाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना मारहाण; नीलम गोऱ्हेंचा संताप

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…

41 मिनिटे ago

पुण्यात भाजप नगरसेविकेचा संताप अनावर; ठेकेदाराला थेट ‘जिवंत जाळण्याची’ धमकी!

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…

2 तास ago

पत्नीचा खून करून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाचा मृतदेह आढळला

पुणे : पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून…

2 तास ago