केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वत:ला बदलायची तयारी ठेवायला हवी.आयुर्वेद म्हणतो, रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल.
रोग का होतात, ते होऊच नये म्हणून जे करायचे त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा जेवणाची वेळ हाच आहे. एकदा का जेवणाची वेळ पाळली, तर अन्य कोणत्याही पॅथीचं, कोणतंही औषध वा डॉक्टरची गरजच नाही, हे मी खात्रीनं सांगू शकतो. कारण निसर्ग हा मोठा डॉक्टर आहे. त्याच्याकडून काही शिकलो तर ही हॉस्पीटल, रक्त तपासणी, औषधं, त्यांचे इफेक्ट साइड, आहारातील पथ्यापथ्य वगैरे काही लक्षात ठेवायला नको. पैसा खर्च करायला नको, फक्त वेळेचं बंधन पाळालं की सगळं आरोग्य सहजतेनं मिळत.
रोग वाढण्याची कारण
रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणं. उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळाच विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्यानं बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणं कमी होत जातात. आणि लवकर बरं वाटतं. म्हणून जेवणाची वेळ पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.
जेवायच्या फक्त दोन वेळा
जेवण नेमकं कोणत्या वेळी घ्यावं, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळालं नाही. पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली. अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात
प्रातराशे तु अजीर्णे अपि,
सायमाशो न दूष्यति
अजीर्णे सायमाशे तु
प्रातराशो हि दूष्यति
म्हणजे दिवसा सेवन केलेलं अन्न सम्यक रितीनं जर पचलं नाही, आणि जर सायंकाळी भोजन केलं, तर विशेष हानी होत नाही. पण सायंकाळी घेतलेलं भोजन जर सकाळी पचलं नसेल आणि सकाळी पुन: अन्न सेवन केलं, तर मात्र हानी अवश्य होते.
अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे. आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रात: आणि सायम प्रात:काल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ. इथे दुपारी आणि रात्री असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावं.
यावरून असं लक्षात येतं की, आपल्या जेवायच्या दोन वेळा आहेत. सकाळी आणि सायंकाळी. हे काही आपल्याला जमणारं नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल, तर काही ना काही करावंच लागेल.
(सोशल मीडियावरून साभार)
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…
‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…
२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…
विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…