महाराष्ट्र

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींच्या २७ टक्के राजकीय आरक्षणाला कोणताही धक्का न लावता घेण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. ओबीसींच्या आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणासंदर्भातील आदेश आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेसंदर्भात आदेश दिल्याचे समोर आले होते. मात्र, आता हा आदेश न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिसत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. न्यायालयात सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी नेमकी कोणती बाजू मांडली आणि काय प्रयत्न केले, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आणण्यासाठी जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असणे आवश्यक आहे. स्वतंत्र नोंदणी झाल्याशिवाय ओबीसींची लोकसंख्या आणि त्यांचे वास्तविक प्रतिनिधित्व स्पष्ट होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या विषयात पुढाकार घ्यावा. विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रश्नावर सरकारला सहकार्य करण्याची विरोधकांची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकांना विरोध नाही, पण आरक्षणाला धक्का मान्य नाही!

आमचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका घेणे मान्य होणार नाही. ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे नुकसान होता कामा नये. २७ टक्के आरक्षण गृहीत धरूनच निवडणुका घेण्यात याव्यात, ही आमची स्पष्ट भूमिका आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण आणि राजकीय हक्क धोक्यात आल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

5 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

5 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

5 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

5 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

5 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

5 तास ago