आरोग्य

हिवाळ्यात लसूण खाणे खूप महत्वाचे

हिवाळ्यात तुम्ही लसूण भाजण्यासाठी गॅस किंवा ओव्हनचा वापर करू शकता. लसणाचा वरचा भाग थोडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावून मीठ आणि काळी मिरी लावा. त्यानंतर मंद आचेवर रोस्ट करा आणि एक ते दोन कळ्या खा. लसूण पचल्यानंतर रक्तात विरघळू लागतो यातील तत्वांमध्ये (एलडीएल) बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. जे लोक रोज लसूण खातात ते लोक जास्त जगतात. यातून असं दिसून येतं की लसूण वाढत्या वयातील लक्षणं कमी करण्यास मदत होते आणि आजारही दूर होतात.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांचे मुख्य कारण ब्लड प्रेशर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशनच्या रिपोर्टनुसार हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. लसणातील कंपोनेंट्स ब्लड प्रेशरच्या औषधांप्रमाणेच शरीरावर परिणाम करतात. हिवाळ्याच्या दिवसात लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास शरीराला बरेच फायदे मिळतात. यातील एंटीइंफ्लामेटरी आणि एंटी ऑक्सिडेंट्समुळे इफेक्ट्स इम्यून सिस्टिम मजबूत राहते आणि सर्दी, खोकल्याची समस्याही उद्भवत नाही. याशिवाय बॅक्टेरिया आणि व्हायरसचा धोका टळण्यास मदत होते. भाजलेला लसूण खाल्ल्याने अल्जायमर, डिमेंशिया दूर होतो, एथलीट परफोर्मेन्स वाढतो, शरीर डिटॉक्स होते आणि हाडांना बळकटी मिळते.

लसूण हा एक मसाला आहे जो भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असतो, जर तो भाज्या किंवा इतर पाककृतींमध्ये टाकला तर टेस्ट वाढते, लसूण गरम होतो आणि त्याचबरोबर त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. नियमित लसणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लसूण बी ६ आणि सी जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन बी ६ चयापचयसाठी उपयुक्त आहे. तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील मोलाची भूमिका बजावू शकते. लसूण कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातील लिपिड लेवल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.

लसूण खाण्याचे फायदे

रक्तदाब राहतो नियंत्रणात

वजन कमी करण्यास होते मदत

हृदय राहते स्वास्थ

सर्दी-खोकल्यावरही उपयोगी

पचनक्रिया सुधारते

श्वास घेण्याच्या त्रासावर उपयोगी

कॅन्सरचा धोका होतो कमी

कोलोस्टेरॉल करते कमी

मधुमेहाचा धोका होतो कमी

हिमोग्लोबिन वाढते

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे काहीही न खाता सकाळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल. लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या ४ कळ्या खाव्यात. अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच याचं सेवन केल्यामुळे आपलं शरिर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं. अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो तसेच आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते. आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही कळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन खूप लवकर कमी होईल. यामध्ये अशी काही संयुगे आढळतात जी शरीरातील अतिरिक्त चरबी वितळविण्यास मदत करतात. भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यासाठी एका पातेल्यात लसूण भाजून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करा. अशाप्रकारे उच्च रक्तदाबामध्ये लसणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. फक्त लक्षात ठेवा दिवसभरात जास्त लसूण खाऊ नका.

भारतीय अन्नपदार्थांत लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लसणामुळे अन्न पदार्थांची चव तर वाढतेच शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे होतात. लसणाची चव कडवट असते मात्र सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. जोपर्यंत लसूण नीट चावून खाल्ला जात नाही तोपर्यंत त्यामध्ये असलेले अॅलिसिन हे तत्त्व शरीराला मिळत नाही. लसूण कच्चा किंवा भाजून व्यवस्थित चावून खाल्ल्यास त्याचा अधित फायदा होतो. लसूण खाणं प्रत्येकासाठी आरोग्यदायी ठरू शकते. परंतु भाजलेला लसूण खाल्ल्यास पुरुषांच्या आरोग्याला अधिक फायदा होतो. जाणून घेऊया भाजलेला लसूण खाल्ल्याने पुरुषांना काय फायदा होऊ शकतो. लसणात असतात अनके पोषक तत्त्व क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अंशुल जयभारत यांच्यानुसार लसणातील प्रमुख पोषक घटक अॅलिसिन आहे. तुम्ही लसूण चावून खाल्ला नाही तर त्याचे संपूर्ण घटक शरीराला मिळत नाहीत.

एलिसिन शिवाय लसणात अँटी फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात. यामुळे अनेक रोगांपासून दूर राहणार मदत होते. लसूण खाल्ल्याने अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो. त्यात असलेले फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, जस्त, तांबे, रिबोफ्लेविन, थायामिन आणि नियासिन हे पोषक घटकही शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. पुरुषांसाठी भाजलेला लसूण खाण्याचे फायदे अंशुल जयभारत यांनी सांगितले की, लसूण भाजलेला किंवा कच्चा लसूण खाल्ल्यास तो हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. भाजलेला लसूण खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. लसूण खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

भाजलेला लसूण खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असेल तर आजच लसूण खाणे सुरू करा. एका अभ्यासानुसार दररोज लसूण खाल्ल्याने सर्दी होण्याची शक्यता 60 टक्क्यांनी कमी होते. तसेच लसूनण खाल्ल्याने सर्दीपासून आराम मिळतो. लसणात असलेले सल्फर कंपाऊंड अॅलिसिन तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा तो नीट चावून खाल्ला जातो.

सल्फर कंपाऊंडचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे पुरुषांबरोबरच महिलांच्या हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाही. तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर तुम्ही लसूण भाजून किंवा कच्चा खाऊ शकता. लसूण खाल्ल्याने उच्च रक्तदाब सामान्य राहतो. तुम्ही दररोज सुमारे चार पाकळ्या लसूण खाऊ शकतो. लसणाच्या पाकळ्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात संशोधनात असे आढळून आले आहे. तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल तर तुम्ही भाजलेला लसूण खावा. तसेच आहारात लसणाचा नियमित समावेश करावा. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

6 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

11 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

12 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

12 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

12 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago