आरोग्य

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात

थंडीत जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं.

त्वचेचं नुकसान: गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाणी अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन स्किनचं नुकसान होतं. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

इन्फेक्शनचा धोका: हिवाळ्यात साधारणपणे त्वचा उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो.

प्रजनन क्षमतेवर प्रभाव: जर व्यक्ती ३० मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

सुरकुत्या येतात: गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल, पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्किनचे पोर्स मोठे होतात. सोबतच स्किनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.

केसगळती: गरम पाण्याने केस आणि डोक्याची स्किन ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.

गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी

गरम पाण्याने १०-२० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून स्कीन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago