चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.
1) सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
2) दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिळेल.
3) निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.
4) मूठभर ओवा एरंडतेल तव्यावर गरम करून सुती कापडात बांधून पोटली करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा.
5) एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.
6) रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.
7) सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.
रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही. तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.
(सोशल मीडियावरुन साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…