आरोग्य

स्टीम फूड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

स्टीम फूड (Steamed Food) म्हणजे वाफेवर शिजवलेले अन्न. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक घटक कधीच कमी होत नाहीत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यातून मिळणारा फायदा म्हणजे शरीराला सर्व प्रकारचे पोषक तत्व सहज मिळतात. या अन्नातील कॅलरीजही खूप कमी असतात. एवढेच नाही तर हे पदार्थ सहज पचतात. स्टीम फूडचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. ते आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.

जीवनसत्त्व आणि खनिजसमृद्ध

अन्न तळून आणि शिजवल्याने त्यातील पोषकतत्त्वे म्हणजेच पोषक द्रव्ये नष्ट होतात. पण, स्टीम फूडमध्ये असे होत नाही. यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ब जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, नियासिन, थायामिन तसेच फॉस्फरस आणि जस्त यांसारखी खनिजे स्टीम फूडमध्ये आढळतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो आणि ते निरोगी राहते.

वजन कमी करा, तंदुरुस्त व्हा

स्टीम फूड खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जाण्याचा धोका पूर्णपणे नाहीसा होतो. स्टीम केलेल्या अन्नामध्ये चरबीचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे वजन कमी करू पाहणाऱ्यांना स्टीम फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. स्टीम फूडमुळे शरीर सक्रिय होते आणि ऊर्जा मिळते.

चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी

स्टीम फूड शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. चवीबरोबरच रंगही त्या पदार्थांचा बदलत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्वही मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पदार्थात मीठ किंवा मसालेही घालू शकता.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अनेकदा स्टीम फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्टीम फूड ब्लड प्रेशरमध्येही खूप उपयुक्त ठरते. स्टीम म्हणजे वाफेने शिजवलेल्या अन्नात वेगळे तेल किंवा तूप टाकले जात नाही. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी वाफेचे अन्न खूप चांगले मानले जाते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

12 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

13 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

13 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

13 तास ago

शिरूर पोलिसांची अवैध दारु विक्रीवर कारवाई; दोन ठिकाणी छापा टाकत मुद्देमाल जप्त…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…

20 तास ago

बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…

20 तास ago