आरोग्य

किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काय कराल जाणून घ्या काही सोपे उपाय

किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. तरतात शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्सही करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचंही काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरतं. अशात आज आम्ही तुम्हाला किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.

पौष्टिक आहार

कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं रोजच्या आहारात समावेश केल्याने किडनींचं आरोग्य चांगलं राहतं. कारण या गोष्टी तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये खाता, ज्या किडनीसाठी फार फायदेशीर असतात. तसेच जास्तीत जास्त पाणी पिणं फार गरजेचं आहे.

पुरेशी झोप

जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो. ज्यामुळे किडनीवरही दबाव पडतो. झोपे दरम्यान किडनी जास्त ब्लड फिल्टर करू शकतात आणि जास्त यूरीनही तयार करतात. ज्यामुळे एक्स्ट्रा फ्लूइड आणि वेस्ट शरीरातून बाहेर निघतात. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे.

पेनकिलर टाळा

वेगवेगळ्या वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक आपल्याच मनाने पेनकिलरचं सेवन करतात. पण पेनकिलरच्या सेवनाने किडनीचा ब्लड फ्लो प्रभावित होतो. जर आधी कुणाला किडनीसंबंधी किंवा डिहायड्रेशनसारखी एखादी समस्या असेल तर पेनकिलरचं सेवन टाळावं.

मीठ कमी खा

शरीरात मिठाचं बॅलन्स कायम ठेवण्यात किडनींची महत्वाची भूमिका असते. जेव्हा शरीरात एक्स्ट्रा सोडिअम जमा होतं, तेव्हा किडनींना ते बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जास्त मिठाचं सेवन करू नये. जास्त मीठ हे हृदयासाठीही घातक असतं.

स्मोकिंग आणि मद्यसेवन

स्मोकिंग केल्याने किडनींचं वेगवेगळं काम प्रभावित होतं आणि किडनीला कॅन्सरचा धोकाही वाढतो. सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांचंही नुकसान होतं. ज्यामुळे किडनीच्या रक्तवाहिन्याही नष्ट होतात. तसेच जास्त मद्यसेवन केल्याने डिहायड्रेशन आणि हायपरटेंशनची समस्याही होते. ज्यामुळे किडनी प्रभावित होतात. अशात किडन निरोगी ठेवण्यासाठी स्मोकिंग आणि मद्यसेवन टाळलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

7 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

7 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

7 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

7 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

8 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

8 तास ago