आरोग्य

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे

छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही.

चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहते.

पचनक्रिया उत्तम राहते

आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो. फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते.

लिव्हर निरोगी ठेवते

अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते. पण तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.

हृदय स्वास्थ्यासाठी

एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो. यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

2 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

2 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

2 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

19 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

19 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

19 तास ago