आरोग्य

जाणून घ्या फिटनेससाठी कोणते बदल करण गरजेचं आहे

व्यायामाला पर्याय नाही:- व्यायामाला शॉर्टकट नसतो. व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी एचआयआयटी वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी एचआयआयटी व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतं.

सकस आहार आवश्यक:- उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं सेवन करणं आवश्यक आहे. यासोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्यांचं योग्य प्रकारे पचन होणंही तितकंच गरजेचं आहे. उदा. ‘क’ जीवनसत्व शरीरातील लोहाचं पचन होण्यासाठी मदत करतं. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याच्या रसाचं सेवन करावं. चरबीयुक्त पदार्थांचं विघटन करण्यासाठी ‘अ’, ‘ड’, ‘इ’ आणि ‘क’ जीवनसत्व मदत करतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात तेलाचं ड्रेसिंग असणारी कोशिंबीर आणि फळं खाण्याचा सल्ला देतात.

श्वसनक्रिया सुरळीत होण्यासाठी:- पोटाचे व्यायाम केल्यानं पोटाच्या स्नायूंसोबतच फुफ्फुसांचंही आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. पोटाचे व्यायाम करताना दीर्घ श्वास घेतला जातो, ज्याचा फुफ्फुसांना फायदा होतो. श्वसनाचे विकार असणाऱ्यांसाठी योग करणं फायद्याचं ठरू शकतं. श्वसनाचे व्यायाम केल्यानं रक्तातील ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित राहते. शिवाय रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.

स्क्रीनटाइमवर असावं नियंत्रण:- अतिरिक्त स्क्रीनटाइम डोळ्यांच्या आजारांना आमंत्रण देऊ शकतं. दिवसभरात इतर व्यायामासोबतच डोळ्यांचे सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे. डोकेदुखीची समस्या सतावणाऱ्या लोकांनी डोळ्यांचे नियमित व्यायाम करायला हवे. यासोबतच डोळ्यांना ताण जाणवत असल्यास डोळे काही सेकंदासाठी बंद करा अथवा हिरवळीकडे बघा.

दीर्घकाळ बसून राहणं वृद्धत्वाला आमंत्रण देऊ शकतं, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. ऑफिसमध्ये काम करताना आपण किती वेळ बसून राहतो हे मोजता येणं अशक्य आहे. बसून काम करताना प्रत्येक तीस मिनिटांनी उभं राहून शरीराची हालचाल केल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असं कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ नमूद करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

13 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

13 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

13 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

13 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

15 तास ago