आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक बाबतीत संपन्नतेचा राहील. तुमच्या कामामुळे कुटुंबाचा लौकिक वाढेल. तुमच्या निर्णयक्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा आनंद वाढेल. आज पूजापठणात तुमची रुची वाढेल, सामाजिक आणि धार्मिक कार्यांत मन लागेल. सायंकाळच्या वेळी प्रकृती थोडी बिघडू शकते, त्यामुळे सावध राहावे.

वृषभ: यश मिळाल्याने तुम्ही आनंदीत व्हाल. आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन जे कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आज नोकरचाकर आणि कौटुंबिक सुख, उपभोगांच्या साधनात वाढ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. सायंकाळपासूनत ते रात्रीपर्यंतचा वेळ देवदर्शन आणि पुण्यकार्यात व्यतित होईल आणि तुम्ही इतरांची मदतही कराल.

मिथुन: आज काही बाबतीत अनावश्यक खर्च होतील. आज तुम्ही त्वरित निर्णय न घेतल्याने तुमच्या कामात काही अडथळे येतील आणि तुमची पिछेहाट होईल. नोकरदारांच्या अधिकारांत वाढ होईल आणि वरिष्ठांची कृपाही राहील. रात्रीचा वेळ गायनवादन आणि मौजमस्तीत जाईल आणि कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित होईल.

कर्क: आज प्रगती होईल आणि आज नशिबाची साथ राहील. आज तुमच्या प्रभावी वक्तृत्वामुळे वरिष्ठ अधिकारीही तुमच्याकडे आकर्षित होण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीची समस्या आल्याने आज दिवस खराब होऊ शकतो, त्यामुळे सावध राहावे लागेल. आज तुमच्या निर्णय क्षमतेचा लाभ होईल. रात्री जास्त तिखट जेवण टाळा, कारण तुमची प्रकृती बिघडू शकते.

सिंह: आज दिवस लाभाचा राहील. व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या व्यापारात काही परिवर्तन होताना दिसतील. नोकरदार व्यक्तींचे अधिकार वाढतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ आणि सन्मानही मिळेल. कुटुंबीयांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत सामाजिक कार्यात भाग घ्याल, तसेच चैनीकडे कल राहील. क्षमतेपेक्षा आज जास्त पैसे मिळतील, त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.

कन्या: तुमच्यावरील जबाबदारीही वाढेल. आज तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेवर बरेच पैसे खर्च कराल, त्यामुळे पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांचे भले व्हावे यासाठी मनापासून काम करता, याचा लाभ तुमच्या संततीला होताना दिसेल. राग आरोग्यासाठी चांगला नाही, हरी बाब लक्षात ठेवा. नुकसान होऊ शकते, आणि सावध राहा.

तुळ: आजचा दिवस प्रतिकूल आहे. आज काही नुकसान होण्याची शक्यता दिसते. तुम्हाला आकस्मिक काही शासकीय दंड होऊ शकतो. त्यामुळे आज धोका पत्करू नका. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत लहानसहान कष्ट आणि मानहानी अशी शक्यता दिसते. आज काही शारीरिक त्रास होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला नुकसान होईल. तसेच आज आत्म सन्मानाला धक्का लागू शकतो.

वृश्चिक: नोकरदारांच्या पद आणि अधिकारांत वाढ होताना दिसतील. तुमचे धाडस आणि पराक्रम यापुढे शत्रू नतमस्तक होतील. संततीबद्दल प्रेमभावना वाढेल. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत ज्ञानवृद्धी होईल. नोकरचाकरांचे सुख मिळेल. आज तुमच्यासाठी लाभ आणि सन्मानाचे योग आहेत आणि तुमचे मन आनंदित असाल.

धनु: आज तुमचा वेळ अध्यात्म आणि तत्वज्ञान प्राप्तीत व्यतित होईल. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने आज नवीन ज्ञानाची प्राप्ती कराल. थकलेले पैसे हाती येतील. सायंकाळी आकस्मिकरीत्या मुलांना काही त्रास होण्याची शक्यता दिसते. तुमचा विश्वासू व्यक्ती आणि किंवा नोकर तुमचा विश्वासघात करतील, त्यामुळे सावध राहावे. धनवृद्धी होईल आणि तुम्हाला लाभ होईल.

मकर: आज उत्साह राहील. आज तुमच्यासमोर असे काही खर्च येतील जे तुम्हाला मनात नसतानाही करावे लागणार आहेत. जर तुमची पदोन्नती रखडली असेल, तर आज तुम्हाला ती मिळू शकते. मोठ्या प्रमाणावर पैसे हाती आल्याने आज तुम्हाला आनंद होईल. शुभ खर्च झाल्याने कीर्ती वाढेल. आज तुमची धनवृद्धी होईल आणि नशिबाची साथ राहील. तुमच्या सन्मानात वाढ होईल.

कुंभ: आज तुम्ही संयमाने कामे करावीत आणि कोणतीही घाईगडबड करू नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते. आज भौतिक सुखसुविधांत वाढ होईल. आज नवीन कामात गुंतवणूक करावी लागली तर आवश्य करा, त्याचा भविष्यात लाभ होईल. मुलांची नोकरी, विवाह इत्यादी कार्यात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमच्या भौतिक सुविधांत वाढ होईल आणि तुमचा दिवस लाभाचा राहील.

मीन: आज दिवस फार चढउतारांचा राहील. आज पोट बिघडल्याने तुमचे प्रकृती खराब होऊ शकते. आज तुम्ही एखाद्या वित्तसंस्थेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तर सहजरीत्या कर्ज मिळेल. नवीन योजना बनवून त्या यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. तुमचे धाडस आणि पराक्रम यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे सुख आणि सन्मान यात वृद्धी होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

11 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

11 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

11 तास ago