आरोग्य

आरोग्यदायी उपयुक्त वांगी

वांगे हे खूपच पौष्टिक आहे. भाजी करताना ते खूप कच्चे नसावे व खूप पिकलेले ही नसावेत. ज्याच्यात परिपक्व असा आहे, पूर्ण विकसित झालेले वापरावे. लहान वांगे हे पित्त व कफ कमी करते. मोठे वांगे पचायला हलके असले तरी थोडे पित्तकर आहे. वांगे खायचे झाल्यास डोरली वांगे, कोंबडीच्या अंड्याचा सारखे असणारे पांढरे वांगे, काटेरी वांगी व गावरान अशा काही जाती आहेत तेच खावे.

) वांग्याचे भरीत: वांगे चांगलं धुऊन घ्यावे. चुलीवर किंवा गॅस वर चांगले भाजावे. वरची जळलेली साल काढून टाकावी. मग त्यात मिरपूड, हिंग, सैंधव टाकून चांगले घोटावे व ज्वारीच्या भाकरी बरोबर खावे. भरिता मध्ये तेल कधीही टाकू नये, टाकले तर पचायला खूपच जड होते. अन्नाचे त्यांनी चांगले पचन होते, भूकही छान लागते. भरतासाठी डोरलं वांग भेटल्यास एकदम उत्तम. ज्यांना झोप लागत नाही त्यांनी रात्री भरीत खावे, तसेच बऱ्याच जणांचे सारखे पोट दुखत असते, पोट फुगले की मग हृदयावर दाब पडतो, मग कसतरी होतय, अस्वस्थ होतं अशी लक्षणे जाणवतात, त्यांना हा भरताचा प्रयोग छान लागू करतो, मात्र यासाठी डोरलं वांग असल्यास उत्तम.

2) ताप खोकला: तापामध्ये ही भाजी जरूर खावी. काहीजण वांग्याच्या बिया काढूनही भाजी करतात. तापात तोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. तोंडास चांगली रुची येते. शरीरातील कफ कमी होऊन, आम कमी होतो. तापात ताजी वांगी वाफवून करावेत, त्यात चवीसाठी सैंधव व आले टाकावं खूप छान भाजी होते. घरातील कुणी आजारी असल्यास, जरूर करून बघा. लाल तिखट टाकू नये. वाफवून भाजी केल्यास छान लागते. तांदूळ भाजून केलेला मऊ भात व वांग्याची भाजी, ताप खोकल्या मध्ये उत्तम आराम देणारी आहे.

३) झोप येण्यासाठी: झोप येण्यासाठी वांगे फायदेशीर ठरते. वांग्यांच्या पानांचा रस दोन चमचे, खडीसाखरेसह घेतल्यास उत्तम झोप लागते.

४) वजनदार व्यक्तींसाठी: काही लोकांचे शरीर हे फुगते, त्यांच्यामध्ये मेद खूपच वाढलेला असतो. त्यांनी अधून मधून वांग्याची भाजी जरूर खावी. अशक्त माणसांनीही भाजी खाल्ली, तर थोड्या दिवसात शक्ती आल्या सारखी वाटेल. अशक्तपणा वरती वांग्याची भाजी खूपच चांगली आहे, त्यामुळेच त्याचा आहारात समावेश करावा. वांगे हे शुक्रधातू वाढवणारे आहे, त्यामुळे ते भोजनात अधून मधून जरूर खावे. वांगे खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असे आहे. मात्र फायद्याची आहे, म्हणून दररोज वांग्याची भाजी खाणे योग्य नव्हे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago