आरोग्य

फॅटी लिव्हरसाठी आहारात करा ३ बदल

फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप जास्त वाढली आहे. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर फॅट जमा होणे आणि सूज येणे. जर वेळीच यावर उपाय केले नाही तर पुढे लिव्हर डॅमेजचा धोकाही वाढतो. फॅटी लिव्हरची समस्या झाली तर सतत कमजोरी जाणवते, पोटाच्या आजूबाजूला वेदना होतात. त्याशिवाय दम लागणे, त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा दिसणे, पायांवर सूज आणि पोटावर सूज अशीही लक्षणं दिसतात.

फॅटी लिव्हर कसं कराल बर

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या इन्सुलिन रेजिस्टेंससंबंधी असते. लिव्हर पुन्हा हेल्दी करण्यासाठीचा सगळ्यात मोठा उपाय लठ्ठपणा कमी करणं हा आहे. तसेच अल्कोहोलपासून दूर रहावे, सॅच्युरेटेड फॅट्स, काही बियांच्या तेलानं सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते.

कॉफी ठरेल रामबाण

अनेक शोधातून समोर आलं आहे की, दिवसातून १ ते २ कप कॉफी प्याल तर लिव्हर सिरोसिसचा धोका कमी होऊ शकतो. पण दिवसातून २ पेक्षा जास्त कप कॉफी पिऊ नये. दोन्ही कॉफीमधील अंतर ६ तासांचं असावं.

व्हिटामिन ई

व्हिटामिन ई ने ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. यामुळे इन्फ्लामेशन कमी होतं आणि लिव्हरवरील फॅट कमी करण्यासही मदत मिळते. यासाठी ड्रायफ्रूट्स, बिया आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

व्हिटामिन डी

व्हिटामिन डी शरीरात कमी झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्हिटामिन डी सप्लीमेंट्स लिव्हरचं काम सुधारू शकतात. सूर्यकिरणांच्या माध्यमातून व्हिटामिन डी मिळवू शकता.

मेडिटेरिअन डाएट

फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर असलेली मेडिटेरिअन डाएट फॅटी लिव्हर ठीक करण्यास मदत करते. तसेच या डाएटनं मेटाबॉलिक कंडीशन ठीक करण्यासही मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

59 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago